कर्नाटकात शिवामोगामध्ये राहुल गांधी यांचा रोड शो

कर्नाटकच्या शिवामोगामध्ये आजपासून पुन्हा काँग्रसेअध्यक्ष राहुल गांधी यांचा रोड शो झाला. याआधी भाजपाध्यक्ष अमित शहांनी शिवामोगामध्ये रोड शो केलाय. साडे अकराच्या सुमाराला राहुल गांधी यांच्या रोड शो ला सुरूवात झाली. 

Surendra Gangan Updated: Apr 3, 2018, 01:25 PM IST
 कर्नाटकात शिवामोगामध्ये राहुल गांधी यांचा रोड शो title=

शिवामो : कर्नाटकच्या शिवामोगामध्ये आजपासून पुन्हा काँग्रसेअध्यक्ष राहुल गांधी यांचा रोड शो झाला. याआधी भाजपाध्यक्ष अमित शहांनी शिवामोगामध्ये रोड शो केलाय. साडे अकराच्या सुमाराला राहुल गांधी यांच्या रोड शो ला सुरूवात झाली. 

होन्नालीहून दावणगेरेपर्यंत हा रोड शो झाला. या रोडशो दरम्यान राहुल ठिकठिकाणी जाहीरसभाही घेणार आहेत. कर्नाटकात काँगसेसाठी  प्रतिष्ठापणाला लागलीय. इथले आपले स्थान वाचवणं काँग्रेससाठी  निकडीचं बनलंय. यासाठीच राहुल इथे आपली पूर्ण ताकद पणाला लावतायत. या दौ-यात राहुल गांधी सिद्धरामय्या सरकारच्या यशाबाबतही जाहीर सभेत बोलणार आहेत.