राणे, केतकर, जावडेकरांनी घेतली खासदारकीची शपथ

राज्यसभेत नव्या सदस्यांचा शपथविधी झाला. महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेल्या नवनिर्वाचित सहा सदस्यांनी खासदारकीची शपथ घेतली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 3, 2018, 02:11 PM IST
राणे, केतकर, जावडेकरांनी घेतली खासदारकीची शपथ  title=

नवी दिल्ली : राज्यसभेत नव्या सदस्यांचा शपथविधी झाला. महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेल्या नवनिर्वाचित सहा सदस्यांनी खासदारकीची शपथ घेतली.

अर्थमंत्री अरुण जेटली, भाजप नेते जी व्ही एल नरसिम्हा राव. सपाच्या राज्यसभा खासदार जया बच्चन आणि काँगेसचे अभिषेक मनु सिंघवी यांनी शपथ घेतली. तर राज्यातून खासदार नारायण राणे,  कुमार केतकर, प्रकाश जावडेकर यांचाही शपथविधी पार पडला. 

राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली. महाराष्ट्रातून सहा खासदारांची बिनविरोध निवड झाली. त्यात शिवसेनेचे अनिल देसाई, राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांचाही समावेश आहे.