नवी दिल्ली : देशात निवडणुकीचं वातावरण आहे. प्रत्येक राजकीय पक्ष त्यादृष्टीने रणनिती आखण्याचा प्रयत्न करतोय. नव्या वर्षाच्या म्हणजेच 2022 च्या सुरुवातीला 5 राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.
अशा परिस्थितीत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) नववर्षाच्या (New Year) सुट्ट्यांसाठी परदेशात (Rahul Gandhi Foreign Trip) गेले आहेत. त्यांचा परदेश दौरा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. राहुल गांधी कुठे आणि किती दिवसांसाठी सुट्टीवर गेले आहेत, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
जानेवारीच्या सुरुवातीलाच राहुल गांधी यांची पंजाबमध्ये (Punjab) सभा होणार आहे. मात्र आता राहुल परदेश दौऱ्यावर रवाना झाल्यामुळे त्यांची रॅली रद्द होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या राजकीय गांभीर्यावर पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत. निवडणुक गांभीर्याने घेणार नसलीत तर निवडणूकीनंतरचं काय असा प्रश्न विचारला जात आहे.
परदेशात सुट्टीवर गेल्यामुळे ट्रोल होण्याची ही राहुल गांधी यांची पहिलीच वेळ नाही, याआधीही अनेक वेळा राहुल गांधी यांच्या परदेश सुट्टीवर प्रश्न निर्माण झालं आहे.