कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८: राहुल गांधी १० फेब्रुवारीला वाढवणार प्रचाराचा नारळ

काँग्रेसने प्रचारात आघाडी घ्यायची रणनिती आखली आहे. या आघाडीचा भाग म्हणूनच पक्षाध्यक्ष राहुल गांधी येत्या १० फेब्रुवारीला विधानसभा प्रचाराचा नारळ वाढवणार आहेत.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Jan 30, 2018, 11:20 PM IST
कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८: राहुल गांधी १० फेब्रुवारीला वाढवणार प्रचाराचा नारळ title=

बंगळुरू : कर्नाटक विधानसभेसाठी काँग्रेसने जोरदार मार्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी काँग्रेसने प्रचारातही आघाडी घ्यायची रणनिती आखली आहे. या आघाडीचा भाग म्हणूनच पक्षाध्यक्ष राहुल गांधी येत्या १० फेब्रुवारीला विधानसभा प्रचाराचा नारळ वाढवणार आहेत.

काँग्रेसच्या प्रगतीपुढे भाजपचा विजयही झाकोळला

२०१४ मध्ये झालेला दारून पराभव. त्यानंतर सातत्याने सुरू झालेली पराभवाची मालिका. ही मालिका उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांपर्यंत चालली. पण, गुजरात विधानसभा निवडणुकीने या पराभवाला छेद दिला. अर्थात गुजरात विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसचा पराभवच झाला. पण, या निवडणुकीत काँग्रेसने प्रंचंड मोठी झेप घेतली. इतकी, की काँग्रेसच्या प्रगतीपुढे भाजपचा विजयही झाकोळून गेला. या निवडणुकीमध्ये भाजपचा विजय झाला असला तरी, बहुमताचा आकडा प्रचंड घसरला.

कर्नाटकमध्ये अॅन्टीइन्कबंन्सीचा धोका

दरम्यान, कर्नाटकमध्ये काँग्रेस सत्तेत आहे. त्यामुळे अॅन्टीइन्कबंन्सीचा धोका ओळखून काँग्रेस कामाला लागले आहे. या वेळी थेट सामना काँग्रेस विरूद्ध भाजप असाच आहे. त्यामुळे भाजपच्या आक्रमक प्रचाराला कसे सामोरे जायचे यावर काँग्रेसमध्ये जोरदार तयारी झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

बूथ लेवलपर्यंत काँग्रेसची मोर्चेबांधणी

महत्त्वाचे असे की, 2018मध्ये विधानसभा निवडणुकांची सुरूवातच कर्नाटकमधून होत आहे. त्यामुळे दक्षिणेकडच्या या राज्यात सत्ता कायम राखत विजयी सुरूवात करण्याचा काँग्रेसचा मनसूबा आहे. त्यामुळे काँग्रेस  कामाला लागला आहे. अर्थात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. विरोधकही सिद्धरमय्या यांचे कर्नाटकातील प्रस्त ओळखून आहेत. पण, तरीही काँग्रेस कोणताही धोका स्विकारायला तयार नाही असे दिसते. म्हणूनच काँग्रेसने अगदी बूथ लेवलपर्यंत मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली आहे.