SBI ची कमाल योजना; अवघ्या 730 दिवसांच्या गुंतवणुकीतून मिळणार दणकून नफा

SBI Scheme : किमान गुंतवणूकीत कमाल नफा हवाय? गुंतवणूक अशी करा जी लक्षातही येणार नाही, पण नफा इतका मिळेल की बसणार नाही विश्वास... 

सायली पाटील | Updated: May 31, 2024, 04:22 PM IST
SBI ची कमाल योजना; अवघ्या 730 दिवसांच्या गुंतवणुकीतून मिळणार दणकून नफा  title=
SBI Sarvottam Term Deposit interest rate deposite news latest update

SBI Scheme : भारतीय स्टेट बँकेकडून खातेधारकांना केंद्रस्थानी ठेवत कायमच काही नवनवीन योजना तयार केल्या जातात. खातेधारक आणि गुंतवणूकदारांची आर्थिक स्थिती पाहता यामध्ये किमान ते कमाल अशा विविध स्तरांमध्ये गुंतवणूक करणं अगदी सहज शक्य असतं. आजवर एसबीआयच्या अशा अनेक योजनांचा फायदा गुंतवणूकदारांना झाला आहे. त्यातच आता बँकेनं एक अशी योजना सादर केली आहे ज्यामध्ये करण्यात येणाऱ्या गुंतवणुकीचा फायदा सर्वांनाच भारावणारा आहे. 

एसबीआयच्या वतीनं एका FD योजनेवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. या वाढीव व्याजदराचा थेट फायदा किरकोळ गुंतवणूकदारांसह जास्त प्रमाणात पैसे गुंतवणाऱ्यांना होणार आहे. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे एसबीआयच्या या विशेष एफडी योजनेमध्ये करण्यात आलेले व्याजदरातील बदल 15 मे 2024 पासून लागू करण्यात आले आहेत. 

एसबीआयची सर्वोत्तम टर्म डिपॉजिट (SBI Sarvottam Term Deposit) ही योजना मागच्याच वर्षी लाँच झाली होती. गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त नफा देण्याच्या हेतूनं त्यावरील व्याजदर निर्धारित करण्यात आले होते. दरम्यान एसबीआयनं सर्वोत्तम एफडी स्‍कीम अंतर्गत डिपॉझिट व्याजदरात 75 बीपीएसची वाढ करण्यात आली. ज्याअंकतर्गत बँक दोन वर्षांसाठी 7.4 टक्क्यांचा व्याज देत आहेत. तर, वीस वर्षांसाठी हेच व्याजदर 7.10 टक्के असल्याचं सांगितलं जात आहे. 

कसं आहे गुंतवणुकीचं गणित? 

एसबीआयच्या या योजनेमध्ये वरिष्ठ नागरिकांना 50 टक्के बेस पॉईंटनं अधिक व्याज दिलं जात आहे. म्हणजेच हा व्याजदर 7.90 टक्क्यांवर वपोहोचल असून, 2 वर्ष म्हणजेच 730 दिवसांसाठी हा व्याजदर लागू आहे. तर, एका वर्षासाठी हा आकडा 7.6 टक्के इतका आहे. 

हेसुद्धा वाचा : आता मुंबईत राहून वडापाव, पावभाजी खायची नाही का? पालिकेच्या सूचना तुम्ही पाहिल्या?

उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती या योजनेमध्ये 2 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक गुंतवणूक करते, तर या योजनेअंतर्गत सर्वसामान्य गुंतवणूकदारांना वर्षभराच्या काळासाठी 7.30 टक्के आणि 2 वर्षांच्या काळासाठी 7.40 टक्के इतका व्याजदर लागू असेल. या योजनेसंदर्भातील सविस्तर माहिती बँकेच्या संकेतस्थळावर किंवा बँकेच्या शाखांमध्ये प्रतिनिधींकडून दिली जाणार आहे. त्यामुळं गुंतवणूकीचा निर्णय घेण्याआधी सविस्तर माहिती घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.