मोदींच्या कार्यपद्धतीवर रघुराम राजन यांचे प्रश्नचिन्ह

 वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधील मोदींच्या तडाखेबंद  भाषणाचा धागा पकडत रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर यांनी अनेक मुद्द्यांवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.  

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Jan 27, 2018, 05:19 PM IST
मोदींच्या कार्यपद्धतीवर रघुराम राजन यांचे प्रश्नचिन्ह title=

नवी दिल्ली: वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये तडाखेबंद भाषण ठोकत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय लोकशाही आणि गतीमान विकसनशिल भारताची प्रतिमा सादर केली. मात्र, मोदींच्या या भाषणाचा धागा पकडत रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर यांनी अनेक मुद्द्यांवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मोदी सरकारमधील ठराविक लोकांचा एक छोटा गट सर्व निर्णय घेतल आहे. त्यातून नोकरशाहीकडेही मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष केले जात आहे, असा टोलाही राजन यांनी हाणला आहे.

रखलडेले उपक्रम हे अत्यंत वेगाने पूर्ण करणे गरजेचे

दाओस येथील भाषणात पंतप्रधान मोदी यांनी भारतात लोकशाही, विविधता आणि वेग (डेमॉक्रसी, डिमॉग्रफी ऐंड डायनमिजम) देशाचे भवितव्य उज्ज्वल करत आहेत. त्यामुळे विकासाच्या वेगानेही गती घेतली आहे. यावरूनच रघुराम राजन यांनी जोरदार आक्षेप नोंदवरत पंतप्रधान मोदींच्या धोरणारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. रखडलेल्या अनेक उपक्रमांचा दाखला देत राजन यांनी म्हटले आहे की, रखलडेले उपक्रम हे अत्यंत वेगाने पूर्ण करणे गरजेचे होते. पण, तसे होताना दिसत नाही.

निर्णय न घेणे ही सुद्धा एक समस्याच

राजन यांनी पुढे म्हटले आहे की, मला भविष्यातील चिंता सतावत आहे. नोकरशाहीच्या निर्णयावर, सूचवलेल्या बदलावर काम होताना दिसत नाही. कामातील अडथळे दूर करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी अनेकदा घोषणा केली आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. उलट, नोकरशहांना भीती वाटते आहे की, आपण स्वतंत्र पातळीवर एखादा निर्णय घ्यायचो आणि आपल्यावर भ्रष्टाचाराचा आरोप व्हायचा. असे होणार असेल तर आम्ही असे कामच का करावे? असा सवालही नोकरशहांच्या मनात आहे. नोकरशाहीने कोणताही निर्णय न घेणे ही सुद्धा एक समस्याच असल्याचे राजन यांनी म्हटले आहे.

अनेक गोष्टींबाबत प्रश्न विचारण्याची वेळ आली

वास्तवात अनेक गोष्टींचे (निर्णयाचे) केंद्रिकरण तर, होत नाही ना? हे विचारण्याची आणि तपासण्याची आता वेळ आली आहे. आम्ही लोकांच्या एका छोट्या समूहाकडून अर्थव्यवस्था चालवत आहोत? आमच्याकडे २.५ ट्रिलियन डॉलर इतकी अवाढव्य अर्थव्यवस्था मॅनेज करण्याची क्षमता आहे?, अशा अनेक गोष्टींबाबत प्रश्न विचारण्याची वेळ आली असल्याचेही राजन यांनी म्हटले आहे.

दरम्यान, नोकरी, नोकरीच्या संधी, इन्फ्रास्ट्रक्चर, कन्स्ट्रक्शन तसेच, डिजिटल क्रांतीच्या गप्पा करताना लोकांना त्यांचा डेटा सुरक्षित राहिल यांची खात्री मिळण्याबाबत ही राजन यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.