कोलकाता : हिवाळ्याच्या रात्री धुक्यामुळे दृश्यमानता कमी असते. त्यामुळे यावेळी रस्त्यावरील अपघातात अनेक कुत्र्यांचा मृत्यू होतो. याबाबत प्राणीप्रेमींनी नाराजी व्यक्त करीत त्यावर उपाय शोधला आहे. त्यामुळे रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांचा जीव वाचविण्यास मदत होणार आहे.
रस्त्यावरील कुत्र्यांचा मृत्यू रोखण्यासाठी एका स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतला. मीरा फाउंडेशन नावाच्या जलपाईगुडीस्थित स्वयंसेवी संस्थेने रस्त्यावरील कुत्र्यांच्या गळ्यात रेडियम कॉलर-बेल्ट घालण्याची मोहीम सुरू केली.
सोमवारी रात्री संघटनेच्या सदस्यांनी जलपाईगुडी शहरातील विविध भागात गट तयार केले. शेकडो भटके कुत्रे पकडून त्यांच्या गळ्यात रेडियमचा पट्टा देण्यात आला. पुढील पंधरा दिवस हे काम केले जाणार असल्याचे संघटनेने सांगितले.