ZEEL - SONY मर्जर डीलला मंजुरी

मर्जरनंतर होणा-या नव्या कंपनीचं लिस्टींग होणार

Updated: Dec 22, 2021, 11:12 AM IST
ZEEL - SONY मर्जर डीलला मंजुरी  title=

मुंबई : ZEEL - SONY मर्जर डीलला ZEEL बोर्डाने मंजुरी दिली आहे. झी एंटरटेन्मेंट आणि सोनी पिक्चर्स इंडिया दरम्यान मर्जर डीलवर स्वाक्ष-या झाल्या आहेत. या मर्जरनंतर सोनी पिक्चर्सचा हिस्सा ५०.८६% होणार आहे.

एस्सेलचा हिस्सा 3.99% असेल. बाकी पब्लिक शेअर होल्डर्सचा हिस्सा 45.15% असेल. मर्जरनंतर पुनीत गोयंका हेच एमडी, सीईओ असणार आहेत. ZEEL च्या १०० शेअर्सच्या बदल्यात ८५ शेअर्स मिळतील.

आधी सोनीच्या शेअर्सचं विभाजन होईल. राईट्स इश्यूच्या माध्यमातून ३६.५ कोटी शेअर जारी केले जातील. ७ हजार ९४८ कोटींचे राईट्स इश्यू जारी होतील. मर्जरनंतर होणा-या नव्या कंपनीचं लिस्टींग होणार आहे.