अंबानींची सून शोभेल इतकी श्रीमंत आहे राधिका मर्चंट; तिच्या संपत्तीचा आकडा पाहून व्हाल थक्क

Radhika Merchant Networth : राधिक मर्चंट आणि अनंत अंबानी यांचा लवकरच विवाहसोहळा पार पडणार आहे. त्या अगोदर राधिका मर्चंट कोण? आणि राधिका मर्चंटची एकूण संपत्ती किती? 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Feb 25, 2024, 01:10 PM IST
अंबानींची सून शोभेल इतकी श्रीमंत आहे राधिका मर्चंट; तिच्या संपत्तीचा आकडा पाहून व्हाल थक्क title=

रिलायन्स ग्रुपचे मालक मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अनंत अंबानी त्याची गर्लफ्रेंड राधिका मर्चंटसोबत लग्न करणार आहेत. लग्नाआधीच्या विधी 1 मार्च 2024 पासून सुरू झाले असून के 8 मार्च 2024 पर्यंत चालणार आहेत. त्याची तयारी जोरात सुरू आहे. सगळीकडे याच लग्नाची चर्चा सुरु आहे. 

राधिका मर्चंट तिच्या कुटुंबाचा व्यवसाय सांभाळते. राधिका मर्चंटला अनेक वेळा महागडे कपडे आणि महागड्या बॅग घेऊन जाताना दिसली आहे. राधिकाचं राहणीमान अतिशय आलिशान आहे. पण तुम्हाला माहित आहे का? मुकेश अंबानी यांच्या धाकट्या सुनेची एकूण संपत्ती किती आहे? या संपत्तीचा आकडा वाचून तुम्ही म्हणाल खरंच ही सून गडगंज श्रीमंत कुटुंबाला शोभते. 

शिक्षण या ठिकाणाहून

राधिका ही भारतीय शास्त्रीय नृत्यांगना आणि एन्कोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे. राधिका मर्चंट अतिशय आलिशान आयुष्य जगत आहे. ती राहत असलेल्या घरात अनेक सुविधा आहेत. राधिका मर्चंट न्यूयॉर्क विद्यापीठातून पदवीधर आहे.

सांभाळते फॅमिली बिझनेस 

राधिका एनकोर हेल्थकेअरच्या बोर्डावर संचालक म्हणून काम करते. राधिका मर्चंट अतिशय स्टायलिश असून तिला नृत्य, पोहणे आणि पुस्तके वाचण्याची आवड आहे. सध्या ती कौटुंबिक व्यवसाय सांभाळत आहे. राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी लहानपणापासूनचे मित्र आहेत.

भरतनाट्यमचं शिक्षण

राधिकाच्या आईचे नाव शैला मर्चंट आहे. राधिका ही वीरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची एकुलती एक मुलगी आहे. 18 डिसेंबर 1994 रोजी मुंबईत जन्मलेल्या राधिकाने तिचे शालेय शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल आणि इकोले मोंडियाल वर्ल्ड स्कूलमधून केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राधिका आणि अनंत अनेक वर्षांपासून एकमेकांचे मित्र आहेत. 28 वर्षांची राधिका ही ट्रेंड डान्सर आहे. श्री निभा आर्ट्सच्या गुरु भावना ठाकर यांच्याकडून तिने भरतनाट्यम शिकले आहे.

एकूण संपत्ती किती

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राधिका मर्चंटचे इंस्टाग्रामवर खूप फॉलोअर्स आहेत. राधिकाच्या वडिलांची एकूण संपत्ती 755 कोटी रुपये आहे. राधिकाच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर मीडिया रिपोर्ट्सनुसार ती 8 ते 10 कोटी रुपये आहे. राधिकाने आपल्या करिअरची सुरुवात एका रिअल इस्टेट कंपनीत ज्युनियर सेल्स मॅनेजर म्हणून केली होती.

गेल्यावर्षी झाला साखरपुडा 

राधिका आणि अनंत दोघेही कॉलेजच्या दिवसांपासून एकमेकांना डेट करतात. अंबानी कुटुंबाच्या सगळ्या कार्यक्रमात राधिका उपस्थित असते. राधिका आणि अनंतने गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात साखरपुडा केला.