मुंबई : बोलायचे झाले तर सर्व मिठाई स्वादिष्ट असतात पण रसगुल्लाची बाब वेगळी आहे. रसगुल्ला (Rasgulla) हे नाव ऐकल्यामुळे प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटले असेल. विशेषत: आपण बंगाली असल्यास तुमचे रसगुल्लावरील प्रेम अधिक कोणाला सांगायला नको. ही अशी एक मिठाई आहे की खाण्यासाठी सर्वात कमी मेहनत करावी लागले. कारण रसगुल्ला तोंडात ठेवताच त्याची गोडी विरघळत जाते.
हा रसगुल्ला स्वत:चा आहे, यासाठी देशातील दोन राज्यांमध्ये जोरदार वाद निर्माण झाला. पश्चिम बंगाल सरकारने सांगितले की, त्यांच्या राज्यात रसगुल्लाचा शोध लागला होता, तर ओडिशाने रसगुल्ल्यावर आपला दावा केला. रसगुल्ल्याच्या नावासंदर्भात एकाधिकारबाबत ओडिशाने केलेल्या दाव्यानंतर दीर्घ कायदेशीर लढाई केल्यावर अखेर पश्चिम बंगालला भौगोलिक संकेत (जीआय) टॅग मिळाला. पण तुम्हाला कधी आश्चर्य वाटले असेल की, आपण ज्या रसगुल्ल्याबाबत बोलत आहोत या स्वादिष्ट मिठाईला इंग्रजीमध्ये काय म्हटले जाते, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का?
रसगुल्ला याचे इंग्रजी नाव जाणून घेण्यासाठी आम्ही ऑक्सफोर्ड डिक्शनरी तपासली आणि त्यानंतर गूगल ट्रान्सलेशनमध्ये रसगुल्लाचे इंग्रजी नावही जाणून घ्यायचा प्रयत्न केला. उत्तरादाखल जे समोर आले ते मनोरंजक होते. संशोधनात असे आढळले आहे की, बर्याच मोठ्या मुलाखतींमध्येही हाच प्रश्न विचारण्यात आला आहे, परंतु बहुतेक उमेदवारांना योग्य उत्तर माहीत नव्हते. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की रसगुल्ल्याला इंग्रजीमध्ये 'सिरप फिल्ड रोल' (Syrup Filled Roll) म्हणतात. ही एक वेगळी बाब आहे की, आजही रसगुल्लाला गूगलवर रसगुल्ला (Rasgulla)म्हणतात. पण त्याचबरोबर नाव 'सिरप फील्ड रोल' आहे.