गौरी लंकेश यांच्या हत्येचा देशभरातून निषेध

गौरी लंकेश यांच्या हत्येचा देशभरातून निषेध व्यक्त केला जातो आहे. अशा प्रकारचा भ्याड हल्ला हा देशात नवीन नाही आहे. तर यापूर्वी साहित्यीक एमएम कलबुर्गी यांची देखील अशाच प्रकारे हत्या करण्यात आली होती.

Updated: Sep 6, 2017, 10:24 AM IST
गौरी लंकेश यांच्या हत्येचा देशभरातून निषेध title=

मुंबई : गौरी लंकेश यांच्या हत्येचा देशभरातून निषेध व्यक्त केला जातो आहे. अशा प्रकारचा भ्याड हल्ला हा देशात नवीन नाही आहे. तर यापूर्वी साहित्यीक एमएम कलबुर्गी यांची देखील अशाच प्रकारे हत्या करण्यात आली होती.

कलबुर्गी यांची ३० ऑगस्ट २०१५ ला गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. तर १६ फेब्रुवारी २०१५ ला कोल्हापुरात कॉम्रेड गोविंद पानसरेंवरही मोटारसायकलवरुन आलेल्या अज्ञात मारेक-यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता त्यात त्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या होत्या. या घटनेच्या दोन वर्षाआधीच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली होती. २० ऑगस्ट २०१३ ला अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला त्यात ते जागीच ठार झाले. विषेश म्हणजे या चारही हत्या एकाच प्रकारे करण्यात आल्या असून यातील कोणत्याही मारेक-याला पकडण्यात अद्याप पोलिसांना यश आलेलं नाही.