Shocking News: रोगापेक्षा भयंकर उपाय; लघवीला प्रॉब्लेम होता, डॉक्टरने डायरेक्ट प्रायव्हेट पार्ट कापला!

Doctor cut the private part : शाहद गावात राहणाऱ्या 50 वर्षाच्या रुग्णाला लघवीचा प्रॉब्लेम होता. उपाय म्हणून शुक्रवारी रात्री त्यांना नातेवाईकांनी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केलं. उपचारादरम्यान डॉक्टरांनी ऑपरेशनचा (Surgery) सल्ला दिला

Updated: Dec 26, 2022, 12:48 AM IST
Shocking News: रोगापेक्षा भयंकर उपाय; लघवीला प्रॉब्लेम होता, डॉक्टरने डायरेक्ट प्रायव्हेट पार्ट कापला! title=
doctor cut the private part

Crime News: झारखंडच्या डाल्टनगंजमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लघवीला त्रास (Problem with Urination) होत असल्याने उपचारासाठी खासगी रुग्णालयात (Private Hospital) पोहोचलेल्या रुग्णाचं गुप्तांग (Private Part) डॉक्टरांनी कापल्यानं एकच खळबळ उडाली आहे. आरोपी खासगी रुग्णालयाचा ऑपरेटर आणि डॉक्टर (Doctor) दोघेही फरार असल्याची माहिती मिळाली आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी या दोघांविरुद्ध पोलीस ठाण्यात एफआयआर (FIR) दाखल केला आहे. (Problem with urination the doctor cut the private part directly Jharkhand Crime News)

शाहद गावात राहणाऱ्या 50 वर्षाच्या रुग्णाला लघवीचा प्रॉब्लेम होता. उपाय म्हणून शुक्रवारी रात्री त्यांना नातेवाईकांनी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केलं. उपचारादरम्यान डॉक्टरांनी ऑपरेशनचा (Surgery) सल्ला दिला आणि 20 हजार खर्च सांगितला. रुग्णाच्या नातेवाईकांनी 10 हजार दिले आणि उर्वरित रक्कम ऑपरेशननंतर देऊ असं सांगितलं. रात्री उशिरा बारा वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात रुग्णाचं ऑपरेशन केलं.

शनिवारी सकाळी रुग्ण लघवी करण्यासाठी बाथरूममध्ये गेला असता, त्याचे गुप्तांग कापल्याचं त्याला समजलं. त्याला लघवी करायला खूप त्रास होत होता. रुग्णाने तातडीने याची माहिती कुटुंबियांना दिली. रुग्णाचे शस्त्रक्रिया करताना गुप्तांग कापल्याची माहिती डॉक्टरांना मिळताच खासगी रुग्णालयातील कर्मचारी चालकासह डॉक्टरांनी घटनास्थळावरून पळ काढला.

आणखी वाचा - Men Health Tips: प्रायव्हेट पार्टमध्ये खाज येण्याच्या समस्येने त्रास आहात? तर हे उपाय करा

दरम्यान, खासगी रुग्णालयाचे संचालक आणि डॉक्टरांनीही रुग्ण आणि त्याच्या कुटुंबियांना पैसे देऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. पीडितेला चांगल्या उपचारासाठी शासकीय वैद्यकीय (Government Medical Hospital) रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, या घटनेनंतर झारखंडमध्ये चर्चा होताना दिसत आहे.