MP Crime : पंकज त्रिपाठीच्या घरावर चढवला बुलडोजर, मुख्यमंत्र्यांनीच घेतली दखल!

 मध्य प्रदेशमध्ये महिलांवर अत्याचार करणाऱ्या कुणालाही सोडलं जाणार नसल्याची प्रतिक्रिया मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. 

Updated: Dec 25, 2022, 11:30 PM IST
MP Crime : पंकज त्रिपाठीच्या घरावर चढवला बुलडोजर, मुख्यमंत्र्यांनीच घेतली दखल! title=

Crime News : मध्यप्रदेशमधील रीवा जिल्ह्यामध्ये बॉयफ्रेंडने मुलीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. आरोपी मुलाने अत्यंत क्रूरपणे मुलीला मारहाण केली होती. त्या मुलीवर रूग्णालयात उपचार सुरू असून मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मध्य प्रदेश प्रशासनाने गांभीर्याने घेतलं. गृह मंत्रालयाकडून आदेश आल्यावर पोलिसांनी थेट आरोपीच्या घरावर बुलडोजर चालवला आहे. मध्य प्रदेशमध्ये महिलांवर अत्याचार करणाऱ्या कुणालाही सोडलं जाणार नसल्याची प्रतिक्रिया मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. घर पाडत असल्याचा व्हिडीओ ट्विट केला आहे.  (rewa news boyfriend pankaj tripathi arrested beat beat girlfriend bulldozer on house latest marathi crime news)

नेमकं काय घडलं?
मध्यप्रदेशमधील रीवा जिल्ह्यातील मऊगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बॉयफ्रेंडने त्याच्या गर्लफ्रेंडला मारहाण केली. व्हायरल होत असलेला व्हिडीओ 10 ते 15 दिवसांआधीचा असल्याची माहिती समजत आहे. संबंधित मुलगी त्या मुलाला लग्नासाठी विचारते त्यावेळी प्रियकराचा पारा चढतो. मुलीचे डोकं खाली आपटतो इतकंच नाहीतर तिला लाथाबुक्क्यांनीही माराहाण करतो. 

रागाने लालबुंद झालेल्या तरूणाला काहीच भान राहत नाही. मुलाने त्या मुलीला इतक्या क्रूरपणे मारहाण केलेली असते की ती बेशुद्ध अवस्थेत जाते. तरूणाच्या मित्राने हा व्हिडीओ शूट केल्याची माहिती समजत आहे. पोलिसांनी या घटनेची माहिती समजताच ते घटनास्थळी दाखल होतात. 

 

पीडित मुलीला दवाखान्यात उपचारासाठी दाखल करतात. त्यानंतर मुलाला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्यावर मारहानीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाबाबत कुटंबियांकडून आणि इतरांकडून माहिती घेतल्यावर दोघांचं प्रेमप्रकरण असल्याचं समोर आलं आहे.