प्रियंका गांधी तडक गाडीतून खाली उतरल्या आणि काच पुसू लागल्या

काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi ) यांनी गाडीची काच पुसताना दिसल्याने सगळेच अचंबित झाले.  

Updated: Feb 4, 2021, 07:51 PM IST
प्रियंका गांधी तडक गाडीतून खाली उतरल्या आणि काच पुसू लागल्या  title=

मुंबई : काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस युवा नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi ) यांनी गाडीची काच पुसताना दिसल्याने सगळेच अचंबित झाले. धुक्यामुळे दृश्यमानता कमी आहे. त्यामुळे गाडी चालवताना पुढचे काहीही दिसत नव्हते. त्यांनी तात्काळ गाडी थांबवली आणि गाडीतून खाली उतरत हातात रुमाल घेत गाडीची काच पुसली. 

गाडी थांबवून प्रियंका यांनी गाडीची काच पुसल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Priyanka Gandhi Video)गाडीची काच पुसल्यानंतर त्या पुढे निघाल्या. सकाळीच त्यांच्या ताफ्यातल्या वाहनांचा अपघात झाला होता. 

प्रियंका गांधी आज उत्तरप्रदेशातील रामपूरकडे रवाना झाल्या. मात्र दिल्लीमधून बाहेर पडताना हापूर रोडवर प्रियंका गांधी यांच्या  ताफ्यातील वाहन एकमेकांना मागून ध़डकल्याने अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. दरम्यान, शहीद झालेल्या शेतकर्‍यांच्या कुटूंबाला भेटण्यासाठी प्रियंका गांधी रामपूरला जात होत्या.