नवी दिल्ली : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जिथं अखेरचा श्वास घेतला, त्या दिल्लीतल्या 26 अलिपूर मार्ग या वास्तूमध्ये बाबासाहेबांचं भव्य स्मारक उभारण्यात आलंय. या स्मारकाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज झालं.
शनिवारी बाबासाहेबांची जयंती आहे. त्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या या कार्यक्रमासाठी पंतप्रधानांनी चक्क मेट्रोमधून प्रवास केला. लोक कल्याण मार्ग मेट्रो स्थानकामध्ये त्यांनी यलो लाईनची मेट्रो पकडली. विधानसभा स्थानकावर उतरून त्यांनी बाबासाहेबांचं स्मारक गाठलं.
स्मारकाचं उद्घाटन केल्यानंतर त्यांनी तिथल्या प्रदर्शनीय वस्तू आणि छायाचित्रांची सफरही केली... यावेळी झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी गेल्या चार वर्षांत दलित, आदिवासींसाठी सरकारनं केलेल्या कामांचा पाढा वाचला.
मात्र, हे करताना काँग्रेसवर टीका करण्याची संधी त्यांनी सोडली नाही... काँग्रेसमधल्या घराणेशाहीला ज्यांनी ज्यांनी विरोध केला त्यांचं अस्तित्व मिटवण्याचा त्या पक्षानं अटोकाट प्रयत्न केल्याचं मोदी म्हणाले.