नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत घेतलेल्या बैठतकीत पक्षातल्या प्रमुख नेत्यांना मध्यावधी निवडणुकांना तयार राहण्याच्या सूचना दिल्या.
ऑगस्ट महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होणार आहे. या बैठकीत मतदारसंघांचा आढावा घेण्यात येणार आहे. प्रत्येक मतदार संघाचा दौरा करण्याच्या सूचना पवारांनी नेत्यांना दिल्या आहेत.
तसेच काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढवण्याची तयारीही या बैठकीतल्या चर्चेत दाखवण्यात आली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची १६ जुलैला स्वतंत्र बैठक घेण्यात येणार आहे.