President Election : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत हे 2 पक्ष महत्त्वाची भूमिका पार पाडणार

भाजप कोणाला उमेदवारी देणार याकडे ही लक्ष...

Updated: May 8, 2022, 11:01 PM IST
President Election : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत हे 2 पक्ष महत्त्वाची भूमिका पार पाडणार title=

President Election : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि ईशान्येकडील विधानसभा निवडणुकीत भाजपने झेंडा फडकवला आहे. या संख्यात्मक बळाचा सर्वसाधारण परिणाम आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत दिसून येईल. राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ७० जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीची शेवटची फेरी पूर्ण झाल्यानंतर, भाजपाकडे सध्या (१०१) जितके कमी-अधिक संख्या आहे, तितकेच संख्याबळ घेऊन पुढे जाईल. या अहवालात जाणून घेऊया की, राज्यसभेच्या निवडणुकीच्या निकालाचा परिणाम राष्ट्रपती निवडणुकीवर कसा होणार आहे.

आसाम आणि हिमाचल प्रदेशात काँग्रेसने आधीच जागा गमावल्या आहेत. उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमधील आणखी दोन जागाही त्यांना गमवाव्या लागणार आहेत. राजस्थान आणि छत्तीसगड सारख्या राज्यांमधून ते भरपाई करू शकतात. मायावतींच्या बसपालाही यूपीमध्ये दोन जागांचे नुकसान होणार आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आम आदमी पक्षाला (AAP) सर्वाधिक फायदा झाला आहे. आम आदमी पक्षाने पाच जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे राज्यसभेत आम आदमी पक्षाच्या सदस्यांची संख्या आठ झाली आहे.

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएकडे अजूनही राज्यसभेत पूर्ण बहुमत नाही. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर एनडीए पूर्वीपेक्षा मजबूत स्थितीत आहे. यामुळे त्यांच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांचा दबदबा कायम राहिल. उत्तर प्रदेशमधून भाजपला राज्यसभेच्या तीन जागा निश्चितपणे मिळतील. अंतिम फेरीच्या निकालांनुसार, या वर्षाच्या अखेरीस वरच्या सभागृहात एनडीएचे संख्याबळ 120 चा आकडा पार करेल.

केरळ, पंजाब, आसाम, त्रिपुरा आणि नागालँडमध्ये 31 मार्च रोजी राज्यसभेच्या 70 जागांसाठी निवडणुका झाल्या. उर्वरित जागांसाठी या निवडणुका जुलैमध्ये होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी होणार आहेत. 

लोकसभेत एनडीएकडे 335 जागा आहेत, संयुक्त पुरोगामी आघाडीकडे 110 आणि इतर राजकीय पक्षांकडे 96 जागा आहेत. एनडीएकडे 1,716 जागा, यूपीए 1,040 आणि इतर राजकीय पक्षांना राज्य विधानसभेत 1,257 जागा आहेत.

सध्या एनडीएचे खासदार (लोकसभेत ३३५ + राज्यसभेत १०७) इलेक्टोरल कॉलेजमध्ये ३,१२,९३६ मतांचे प्रतिनिधित्व करतात. प्रत्येक खासदाराच्या मताचे मूल्य ७०८ आहे. राज्यांच्या विधानसभांमधील आमदारांच्या मताचे मूल्य राज्यानुसार बदलते. यामुळे NDA च्या खात्यात एकूण 2,18,321 मतांची भर पडते. एकूणच, NDA चे एकूण मत मूल्य 5,31,257 आहे, जे 5,49,452 च्या बहुमताच्या आकड्यापेक्षा किंचित कमी आहे. अशा परिस्थितीत भाजपचे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि आंध्र प्रदेशचे वायएस जगन मोहन रेड्डी यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत, तेव्हा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएसाठी कोणताही मोठा अडथळा येणार नाही.