नवी दिल्ली : रामनाथ कोविंद मंगळवारी देशाचे १४ वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहे. कोविंद देशाचे दुसरे दलित राष्ट्रपती होणार आहे. सामान्य जीवन आणि कुशल व्यक्तीमत्त्वाचे धनी असलेले रामनाथ कोविंद बिहारचे राज्यपाल होते.
साधारण २६ वर्षांपासून कोविंद यांनी सार्वजनिक जीवनात आपल्या शांत स्वभाव आणि कर्तव्यनिष्ठेने वेगळी ओळख निर्माण केली आहे. हा गुण त्यांच्या कुटुंबियामध्येही पाहायला मिळत आहे.
रामनाथ कोविंद यांच्या कुटुंबात पत्नी आणि दोन मुलं आहेत. त्यांची मुलगी स्वाती एअर इंडियामध्ये एअर होस्टेस पदावर कार्यरत आहे. मीडिया सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्वातीनने आजपर्यंत आपल्या वडिलांच्या पदाचा आपल्या हितासाठी कधीच वापर करून घेतला नाही.
१) स्वाती ऑस्ट्रेलिया, युरोप आणि यूएस सारख्या लांबच्या मार्गावर उडणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग ७७७ आणि ७८७ एअरक्राफ्टमध्ये कार्यरत आहे.
२) स्वाती ही रामनाथ कोविंद यांची मुलगी आहे, हे कधी क्रू मेंबरला माहिती नव्हते. आता त्यांना माहिती नाही की ती राष्ट्रपतींची मुलगी आहे.
३) स्वातीने गेल्यावर्षी प्रिव्हिलेज लीवसाठी सुट्टी घेतली, तेव्हा पण सांगितले नाही की वडिल राष्ट्रपती निवडणूक लढवित आहेत आणि त्यासाठी सुट्टी हवी आहे.
४) स्वातीच्या ऑफिशयल रेकॉर्डमध्ये आपल्या आईचे नाव सविता आणि वडिलांचे नाव आर एन कोविंद लिहिले आहे.
५) स्वाती यांचे मामा देखील एअरलाइनमध्ये इन फ्लाइट सुपरव्हाइजर म्हणून रिटायर झाले आहेत.
६) स्वाती यांना विचारले की तिने आपली ओळख का लपवली, त्यावेळी त्या म्हणाल्या की वडिलांनी कायम स्वावलंबी बनण्याची शिकवण दिली आहे.
७) रामनाथ कोविंद यांच्या विजयानंतर त्यांचे कुटुंबिय १० अकबर रोड येथे उपस्थित होते. यावेळी पत्नी सविता, मुलगी स्वाती, मुलगा प्रशांत तसेच नात आणि नातू उपस्थित होते.