पेपर भिरकावल्याप्रकरणी काँग्रेसचे सहा खासदार ५ दिवसांसाठी निलंबित

काँग्रेसच्या सहा खासदारांना आज पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आलंय.

Updated: Jul 24, 2017, 04:09 PM IST
पेपर भिरकावल्याप्रकरणी काँग्रेसचे सहा खासदार ५ दिवसांसाठी निलंबित title=

नवी दिल्ली : काँग्रेसच्या सहा खासदारांना आज पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आलंय.

लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यावर कागद उधळल्य़ाप्रकरणी ही कारवाई करण्यात आलीय.

निलंबित खासदारांमध्ये काँग्रेसचे गौरव गोगोई, अधिररंजन चौधरी, रंजिता रंजन, एम के राघव, के सुरेश, आणि सुश्मिता देव अशी या सहा खासदारांची नावं आहेत.

आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालीये. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी मोठा गोंधळ घातला.