Shark Tank India : आईचं दूध आणि बापाच्या DNA पासून दागिने बनवणारी तरुणी; कमाई ऐकून थक्क व्हाल?

कुणी कल्पनाही करु शकत नाही अशी भन्नाट कल्पना या तरुणीला सुचली आहे. आई आणि बाळाला जोडणारी नाळ तसेच आईच्या दुधापासून ही दागिने तयार करते.  

Updated: Jan 27, 2023, 05:05 PM IST
Shark Tank India : आईचं दूध आणि बापाच्या DNA पासून दागिने बनवणारी तरुणी; कमाई ऐकून थक्क व्हाल? title=

Shark Tank India Preeti Maggo : शार्क टँक इंडिया (Shark Tank India ) हा  रिऍलिटी शो सध्या चांगलाच ट्रेंडिगमध्ये आहे. अनेक हटके बिझनेस आयडिया घेऊन नवउद्योजक या शोमध्ये भांडवल मिळवण्यासाठी येतात.  प्रीति मग्गो (Preeti Maggo)देखील त्यांच्या भन्नाट बिझनेस आयडिया चर्चेत आल्या आहेत. पालकत्व हे आई आणि वडिल दोघांसाठीही आयुष्यांतील महत्वाचा टप्पा असतो. पालकत्वाचा क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी प्रीति मग्गो यांनी अशा वस्तूंपासून दागिने तयार केले आहेत की कुणी कल्पनाही करु शकत नाही. ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण प्रीति मग्गो या आईचं दूध आणि पित्याचा DNA अर्थात रक्तापासून स्पेशल दागिने बनवतात. 

प्रीती यांनी मॅजिक ऑफ मेमरीज नावाने स्वतःचा स्टार्टअप सुरु केला. ज्याचे ग्राहक दिवसेंदिवस वाढतच आहेत. शार्क टँक इंडियामध्ये आपली बिजनेस आयडीया मांडण्याची संधी मिळाल्यानंतर प्रीति मग्गो चर्चेत आल्या. सोशल मीडियावर त्यांचे फॉलेअर्स देखील वाढत आहेत. 

2019 मध्ये सुरु केले मॅजिक ऑफ मेमरीज स्टार्टअप

प्रीती मग्गो यांनी 2019 मध्ये मॅजिक ऑफ मेमरीज नावाचे त्यांचे स्टार्टअप सुरु केले. प्रीता या आईचे दूध, केस, नाळ आणि रक्तापासून दागिने बनवतात. प्रीती यांनी  शार्क टँक इंडियामध्ये सहभाग घेतला तेव्हा आपल्या या स्टार्टअपसाठी 25 लाख रुपयांची गुंतवणूक मागितली. शार्क टँक इंडियाने त्याच्या कल्पनेला पाठिंबा दिला नाही. 

पालकांच्या आठवणी जपण्यासाठी खास दागिना

पालकांच्या आठवणी जपण्यासाठी प्रीती या खास दागिना घडवतात. ज्याचे मूल्य सोनं चांदीच्या धातूपेक्षा अधिक आहे. कारण हा दागिन्यांमध्ये भावनिक गुंतवणुक आहे. प्रीती या आई आणि बाळाच्या नाळापासून दागिने बनवतात. आई-वडिलांच्या आठवणी आपल्याजवळ ठेवता याव्यात म्हणून त्या आईचे दूध तसेच रक्ताने देखील दागिने बनवतात. प्रीती या महिलांसाठी आईच्या दुधापासून लॉकेट्स आणि इतर गोष्टी बनवतात जेणेकरून त्यांना आयुष्यभर मातृत्वाचा आनंद घेता येईल. प्रीती घरातील पाळीव प्राण्यांसाठी वेगवेगळ्या डिझाइनचे दागिनेही डिझाइन करतात. आतापर्यंत त्यांनी 600 हून अधिक लोकांसाठी दागिने डिझाइन केले आहेत.

या हटके स्टार्टअपची आयडिया कशी सुचली?

फेसबुकच्या माध्यमातून आईच्या दुधापासून दागिने बनवण्याची कल्पना सुचल्याचे प्रीती यांनी सांगितले. एका जर्मन कलाकाराचा असे दागिने बनवतानाचा व्हिडिओ त्यांनी पाहिला होता. 2019 मध्ये, जेव्हा प्रीतीचे बाळ 6 महिन्यांचे होते, तेव्हा त्यांनी आईच्या (स्वत:च्या) दुधाचा दागिना सॅम्पल म्हणून तयार केला. त्यांचा हा अनोखा दागिना लोकांना आवडला. इथूनच त्यांच्या स्टार्टअपला सुरुवात झाली. त्यांना अशा प्रकारचे दागिने बनवण्याच्या ऑर्डर्स मिळू लागल्या. 

या अनोख्या दागिन्यांची किंमत किती? 2 हजार ते लाख रुपये किंमत

प्रीती यांनी आईचे दूध, रक्त किंवा नाळ यापासून बनवलेल्या दागिन्यांची किंमत 2 हजार रुपयांपासून ते लाखांपर्यंत आहे. या दागिन्यांच्या किंमती प्रामुख्याने लोकांनी निवडलेल्या धातू आणि डिझाइनवर आधारित असतात. सध्या प्रीती लोकांच्या मागणीनुसार अंगठ्या, पेंडेंट आणि ब्रेसलेट आणि कोणत्याही डिझाइनचे दागिने बनवत आहेत.

प्रीती यांची कमाई किती?

प्रीती त्यांच्या या आगळ्या वेगळ्या स्टार्टअपमधून दर महिन्याला पाच लाख रुपयांपर्यंत कमाई करत आहे. प्रीती या मूळच्या जालंधरच्या रहिवासी असून सध्या त्या दिल्लीत राहत आहेत. जामिया हमदर्द विद्यापीठातून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले आहे.

कसे बनवले जातात हे दागिने

आईच्या दुधापासून किंवा रक्तापासून दागिने बनवण्यासाठी सर्वप्रथम ते प्रिझर्वेटिव्ह टाकून संरक्षित केले जातात. कारण, शेवटी यावस्तू नाशवंत असल्याने दागिना  खराब होऊ शकतो. यामुळेच सर्वप्रथम आईचे दूध आणि रक्त प्रिझर्वेटिव्ह टाकून जतन केले जाते. यानंतर ते कडक केले जाते जेणेकरून मोल्डिंग देणे सोपे होईल. यानंतर ग्राहकांच्या पसंतीनुसार जदागिने घडवले जातात.