नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील ( जेएनयू) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. दीपिकाने जेएनयूतील तुकडे-तुकडे गँग आणि अफझल गँगला पाठिंबा दिल्याचा आरोप करत भाजपचे नेते तेजिंदर पाल बग्गा यांनी तिच्यावर टीका केली. यावेळी त्यांनी दीपिकाच्या आगामी 'छपाक' या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचेही आवाहन केले. यानंतर सोशल मीडियावर #boycottchhapaak हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे.
'आमच्याकाळी जेएनयू विद्यापीठात तुकडे-तुकडे गँग नव्हती'
या सगळ्याविषयी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना प्रसारमाध्यमांकडून विचारणा करण्यात आली. तेव्हा प्रकाश जावडेकर यांनी म्हटले की, हा लोकशाही देश आहे. देशातील कोणताही व्यक्ती, कलाकार कुठेही जाऊ शकतो. स्वत:चे विचार मांडू शकतो, असे जावडेकर यांनी सांगितले.
आता संपूर्ण देशच काश्मीर झालाय; यशवंत सिन्हांची भाजपवर टीका
दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU)विद्यार्थी आणि शिक्षकांवर झालेल्या हल्ल्यानंतर राजधानीतील वातावरण प्रचंड तापले आहे. जेएनयूच्या विद्यार्थ्यांकडून याविरोधात जोरदार निदर्शन सुरु आहेत. या आंदोलनात मंगळवारी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण ही सहभागी झाली होती. दीपिका पदुकोण सध्या तिच्या 'छपाक' या चित्रपटाच्या प्रमोशनासाठी दिल्लीत आली होती. यावेळी तिने जेएनयू कॅम्पसच्या बाहेर जमलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. रविवारच्या हल्ल्यात जखमी झालेली 'जेएनयूएसयू'ची अध्यक्ष आइशी घोष हिची दीपिकाने गळाभेट घेतली. यानंतर दीपिका पदुकोण थोडावेळ विद्यार्थ्यांसोबत थांबली होती. दीपिकाच्या या भूमिकेमुळे सोशल मीडियावर अनेकांनी तिचे कौतुक केले आहे. मात्र, त्याचवेळी दीपिकाला विरोधाचाही सामना करावा लागत आहे. याचा फटका तिच्या 'छपाक' या चित्रपटाला बसू शकतो.