मुंबई : आजही लोकांचा सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवर (Public Provident Fund ) विश्वास आहे, ही एक अशी गुंतवणूक आहे, ज्यावर तुम्हाला केवळ चांगले व्याजच मिळते असे नाही, तर यामुळे करांची बचत देखील चांगली होते. जर तुम्ही पीपीएफमध्ये 34 रुपये म्हणजेच महिन्याला 1000 रुपये दिवसांची गुंतवणूक केली, तर ते लाखो रुपयांपर्यंत पोहोचते. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, पीपीएफमध्ये मासिक 1000 रुपयांच्या छोट्या गुंतवणूकीने आपण लाखो रुपयांची कमाई कशी करू शकता ते.
पीपीएफ खाते 15 वर्षांत मॅच्यूअर होते. म्हणजेच 15 वर्षानंतर खातेदार आपले सर्व पैसे काढून घेऊ शकतील. परंतु आपण पैसे काढण्याऐवजी खाते चालू ठेवले तर आपण लाखो रुपयें मिळवू शकतो, ते ही कुठल्याही रिस्क शिवाय.
15 वर्षानंतर तुम्ही 5-5 वर्षांसाठी पीपीएफ खाते जितक्या वेळा वाढवू शकता तितक्या वेळा वाढवा. या दरम्यान, आपल्याला दरमहा गुंतवणूकीची इच्छा असल्यास किंवा आपण गुंतवणूक न करता खाते चालू ठेवू शकता. जर तुम्ही गुंतवणूकीचा पर्याय निवडला नाही तरी खात्यात पैसे असल्यावर व्याज जमा होतच राहिल. सध्या पीपीएफवर 7.1 टक्के व्याज दिले जात आहे.
जर तुम्ही पीपीएफमध्ये दरमहा 1000 रुपये गुंतवले, तर तुमची ही छोटी गुंतवणूक लाखो रुपयांपर्यंत पोहचू शकते. यासाठी काही महत्वाच्या गोष्टी आहेत, ज्या तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत.
सर्व प्रथम, आपण पीपीएफमध्ये गुंतवणूक अगदी लहान वयातच करावी. समजा तुम्ही वयाच्या 20 व्या वर्षापासून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली असेल. तर तुम्ही स्वत: 60 वर्षांचे होईपर्यंत हे चालवू शकता.
पीपीएफमधील गुंतवणूक पहिल्यांदा किमान 15 वर्षांच्या कालावधीसाठी केली जाते. अशा परिस्थितीत जर तुम्ही 15 वर्षांसाठी दरमहा 1000 रुपये जमा करत असाल. तर तुम्ही एकूण 1.80 लाख रुपये जमा कराल. परंतु तुम्ही पीपीएफमध्ये पैसे ठेवलात तर, त्या 15 वर्षानंतर तुम्हाला 3.25 लाख रुपये मिळतील. यामध्ये 7.1% दराने तुमचे व्याज 1.45 लाख रुपये मिळेल.
जर तुम्ही आता पीपीएफ 5 वर्षांसाठी वाढवत असाल आणि त्यामध्ये दरमहा 1000 रुपयांची गुंतवणूक करत असाल, तर 5 वर्षानंतर 3.25 लाख रुपयांची रक्कम वाढून 5.32 लाख रुपये होईल.
5 वर्षांनंतर तुम्ही पुन्हा पीपीएफ गुंतवणूक केली आणि 100 रुपये गुंतवणूक सुरू ठेवल्यास पुढील 5 वर्षानंतर तुमच्या पीपीएफ खात्यातील रक्कम वाढून 8.24 लाख रुपये होईल
जर तुम्ही या पीपीएफ खात्याला तिसर्या वेळी आणखीन पाच वर्षे वाढवली आणि 1000 रुपयांची गुंतवणूक सुरू ठेवली, तर एकूण गुंतवणूकीचा कालावधी 30 वर्षे असेल आणि त्यामुळे तुमच्या पीपीएफ खात्यातील रक्कम वाढून 12.36 लाखांवर जाईल.
जर आपण हे पीपीएफ खाते 30 वर्षांनंतर 5 वर्षांसाठी वाढवत असाल आणि महिन्यात 1000 रुपये गुंतवत रहाल तर. अशा परिस्थितीत तुमच्या पीपीएफ खात्यात पुढील 35 वर्षानंतर म्हणजेच तुमच्या पीपीएफ खात्यातील रक्कम 18.15 लाखांवर जाईल.
म्हणजेच अगदी कमी गुंतवणूक करुन तुम्ही पीए खात्यातून जास्त पैसे जमा करु शकता.