पोलिसांनी पकडल्या इतक्या कोटींच्या 500, 2000 च्या खोट्या नोटा

पोलिसांनी आलं मोठं यश

शैलेश मुसळे | Updated: Apr 18, 2018, 03:40 PM IST
पोलिसांनी पकडल्या इतक्या कोटींच्या 500, 2000 च्या खोट्या नोटा title=

बंगळुरु : देशभरातील नोटा अचानक गायब झाल्याने लोकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. यातच कर्नाटक पोलिसांनी मोठं यश मिळालं आहे. कर्नाटक पोलिसांनी एका व्यक्तीकडून 7 कोटींच्या खोट्या नोटा जप्त केल्या आहेत. कर्नाटक पोलिसांनी या प्रकरणात एका व्यक्तीला अटक केली आहे. बेलागवी भागात पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

कर्नाटकमध्ये काही दिवसांमध्येच निवडणुका होणार आहेत. राज्यामध्ये आचार संहिता लागू झाली आहे. पण त्याआधी इतक्या मोठ्या प्रमाणात खोट्या नोटा सापडल्याने पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा आता अजून सतर्क झाल्या आहेत.