Video Viral: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पोट धरून हसायला लावतात, तर काही व्हिडीओमधून बोध मिळतो. असाच एक पोलिसांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडीओत वाहतूक पोलीस नियमांचं भंग करणाऱ्या दुचाकीस्वारांना अनोख्या पद्धतीने समजूत घालत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाना व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीहीपोलीस अधिकाऱ्याचे कौतुक कराल. नेटकरी या व्हिडीओला पसंती देत आहेत. तुम्हीही हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अधिकाऱ्याच्या स्टाईलचं कौतुक कराल.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक पोलिस अधिकारी लोकांना हेल्मेट घालण्याचे आवाहन अतिशय अनोख्या पद्धतीने करत आहे. पोलीस अधिकारी त्यांना मंत्र उच्चारण्याच्या स्टाईलमध्ये हेल्मेट घालतात. त्याचबरोबर पुढच्या वेळी पकडले गेल्यावर पाच पट दंड आकारला जाईल, असंही सांगत आहेत. दुसरीकडे ही चूक करणार नाही, असं चालक सांगत आहे. @JaikyYadav16 नावाच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
इस भाई को इतनी इज़्ज़त से तो शादी में सेहरा भी नहीं पहनाया गया होगा pic.twitter.com/UQn1gRFypz
— Jaiky Yadav (@JaikyYadav16) September 9, 2022
या व्हिडीओवर व्ह्यूज आणि कमेंट्सचा पाऊस सुरु आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 1182 हून अधिक वेळा रिट्विट झाला आहे. एका यूजरने लिहिले की, 'लोक त्यांच्या पॅशनला खूप चांगल्या प्रकारे फॉलो करतात, त्यापैकी एक हे सर आहेत. उत्तम पोलीस अधिकारी!' आणखी एका युजरने लिहिले की, 'पंडितजींचे नाव काय आहे? नामजप खूप छान करत आहे.'