पार्टीत सुरु होती 'पत्नींची अदलाबदली', पोलिसांनी धाड टाकल्यानंतर खळबळ, प्रत्येक रुममध्ये एकासह...

चेन्नईत पोलिसांनी देहविक्री रॅकेटचा भांडाफोड केला आहे. गेल्या 8 वर्षांपासून तामिळनाडूतील वेगवेगळ्या शहरांमध्ये हे रॅकेट सुरु होतं. आरोपी अविवाहित पुरुषांना टार्गेट करत होते.   

शिवराज यादव | Updated: Nov 8, 2023, 07:42 PM IST
पार्टीत सुरु होती 'पत्नींची अदलाबदली', पोलिसांनी धाड टाकल्यानंतर खळबळ, प्रत्येक रुममध्ये एकासह... title=

चेन्नईत पोलिसांनी एका देहविक्री रॅकेटचा भांडाफोड केला आहे. 'पत्नींची अदलाबदल' (Wife Swapping) करण्याच्या नावाखाली हे रॅकेट चालवलं जात होतं. सोशल मीडियावर जाहिरातींच्या माध्यमातून पीडितांना आपल्या जाळ्यात ओढलं जात होतं. ईस्ट कोस्ट रोड पोलिसांनी पार्टीवर धाड टाकत त्यांचं पितळ उघड पाडलं. पोलिसांनी याप्रकरणी 8 जणांना अटक केली आहे. गेल्या आठ वर्षांपासून तामिळनाडूतील चेन्नई, कोईम्बतूर, मदुराई अशा एकूण 8 शहरात त्यांनी या पार्टीचं आयोजन केलं होतं. 

तपासात समोर आलं आहे की, अटक करण्यात आलेले आरोप सेंथिल कुमार, चंद्रमोहन, शंकर, कुमार, वेलराज, पेरारसन, सेल्वन आणि वेंकटेशकुमार हे सिंगल असणाऱ्या पुरुषांना लक्ष्य करत असतं. एखाद्या महिलेची ती आपली पत्नी म्हणून त्याच्याशी ओळख करुन देत असतं. यानंतर ते Wife Swapping म्हणजेच पत्नीची अदलाबादल करण्याच्या नावाखाली त्यांना आपल्या जाळ्यात ओढत असत. 

तपास अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "या टोळीने पत्नींच्या अदलाबदलीची ऑफर देण्यासाठी एक सोशल मीडिया पेज तयार केलं होतं. यामध्ये ते 13 ते 25 हजारांची ऑफर देत पुरुषांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करायचे. जितके जास्त पैसे दिले जातील तितक्या जास्त महिला त्यांच्यासह बीच हाऊसमध्ये असतील अशी ऑफर ते द्यायचे".

पोलिसांनी 8 जणांना अटक केली असून काही महिलांची सुटकाही केली आहे. या महिला 30 ते 40 वर्षं वयोगटातील आहेत. या सर्वजणी विवाहित महिला असून मोठी रक्कम देण्याचं आमिष दाखवत या स्वॅप पार्टीत सहभागी करुन घेतलं जायचं. 

शेजाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर हे रॅकेट उघडकीस आलं. घरामध्ये मोठ्या प्रमाणात पुरुष येत असून, मध्यरात्रीनंतरही गाणी आणि मद्यपान सुरु असल्याने शेजाऱ्यांनी तक्रार केली होती. तक्रार मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक एन एस कुमार घरात दाखल झाले होते. यावेळी मध्यम वयाचे काही उद्योजक वेगवेगळ्या रुममध्ये महिलांसोबत असल्याचं त्यांना आढळलं. पोलिसांनी यानंतर आठजणांना अटक केली आणि महिलांकडून लेखी माहिती घेतल्यानंतर त्यांना कुटुंबीयांसह जाण्याची परवानगी दिली. 

पोलिसांनी आठजणांना अटक केल्यानंतर मंगळवारी मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर केलं होतं. यावेळी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.