'कपडे काढ, मला शरिरसुख हवंय', बार डान्सरची मागणी अन् लष्कर अधिकाऱ्याने जागीच केलं ठार, आधी हातोड्याने...

Crime News: देहरादूनमध्ये एका बार डान्सरच्या हत्येप्रकरणी लष्कर अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. पीडित तरुणी नेपाळची असून सिलिगुडी येथे नोकरी करत होती.   

शिवराज यादव | Updated: Sep 11, 2023, 05:45 PM IST
'कपडे काढ, मला शरिरसुख हवंय', बार डान्सरची मागणी अन् लष्कर अधिकाऱ्याने जागीच केलं ठार, आधी हातोड्याने...  title=

उत्तराखंडची राजधानी देहरादून एका हत्याकांडामुळे हादरलं आहे. पोलिसांना रविवारी सिरवालगढ येथे एका तरुणीचा मृतदेह आढळला होता. यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला असता, जे काही समोर आलं त्यानंतर हादराच बसला. याचं कारण या हत्येमागे एक लष्कर अधिकारी होता. पोलिसांनी या लष्कर अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. चौकशीदरम्यान पोलिसांना अनेक आश्चर्याचे धक्के बसले. पीडित तरुणी मूळची नेपाळची होती आणि पश्चिम बंगालच्या सिलिगुडी येथे वास्तव्यास होती. मृतदेह सापडल्यानंतर त्याची ओळख पटवण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. पण अखेर पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा केला आहे, ज्यामुळे सगळेच हादरले आहेत.

एका लेफ्टनंट कर्नलने या तरुणीची हत्या केली होती. चौकशी केली असता हे विवाहबाह्य संबंधाचं प्रकरण असल्याचं समोर आलं आहे. आरोपी अधिकारी देहरादूनमध्ये तैनात होता. तपासाअखेर पोलिसांनी पंडितवाडी प्रेमनगर येथील निवासस्थावरुन अटक केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी नेपाळच्या काठमांडू येथील राहणारी आहे. सिलिगुडी येथे ती नोकरी करत होती. येथेच तिची भेट लष्कर अधिकाऱ्याशी झाली होती. तरुणी लष्कर अधिकाऱ्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती आणि यासाठीच ती त्याच्या मागोमाग देहरादून येथे पोहोचली होती. 

लष्कर अधिकारी क्लेमेनटाउन येथे होता तैनात

लष्करात लेफ्टनंट कर्नल असणारा रामेंदू उपाध्याय, क्लेमेंटटाऊनमध्ये तैनात होता. आरोपी 2010 मध्ये विभागीय आयोगावर लेफ्टनंट झाला होता. जानेवारी 2020 त्याची भेट मूळची नेपाळची असणाऱ्या श्रेया शर्माशी झाली होती. पश्चिम बंगालच्या डान्स बार सिटी सेंटर मॉलमध्ये त्यांची भेट झाली होती. यावेळी लष्कर अधिकाऱ्याला श्रेया फार आवडली होती. 

पहिल्या भेटीतच झाली होती मैत्री

पहिल्याच भेटीत लष्कर अधिकाऱ्याची आणि श्रेयाची मैत्री झाली होती. यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. सिलिगुडीत दोघंही पती-पत्नीप्रमाणे एकत्र राहत होते. जेव्हा अधिकाऱ्याची पोस्टिंग देहरादून जिल्ह्यात झाली तेव्हा तो श्रेयालाही आपल्यासोबत घेऊन आला होता. पण जेव्हा त्याच्या पत्नीला याची माहिती मिळाली तेव्हा त्याने काही दिवस श्रेयाला हॉटेलमध्ये ठेवलं आणि नंतर सिलिगुडीला परत पाठवून दिलं. 

लग्नासाठी दबाव टाकत होती श्रेया

काही दिवसांनी त्याने पुन्हा एकदा श्रेयाला देहरादूनला बोलावून घेतलं. काही दिवस हॉटेलमध्ये ठेवल्यानंतर त्याने क्लेमनटाउन येथे एक घर भाड्याने घेतलं. काही दिवसांनी श्रेया त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकू लागली. यामुळे अधिकाऱ्याने तिला जीवे मारण्याची योजना आखली. 

दारुच्या नशेत शारिरीक संबंध ठेवण्याची मागणी

9 सप्टेंबरला अधिकारी श्रेयाला बिअर पिण्यासाठी राजपूर रोड येथील एका क्लबमध्ये घेऊन गेला. येथे दोघांनी रात्री मद्यपान केलं. यानंतर दोघं तेथून बाहेर पडले होते. घऱी परतत असताना अधिकाऱ्याने आपली कार जंगलच्या रस्त्याने घातली. श्रेयाने मद्यपान केलं असल्याने शारिरीक सुखाची मागणी करत कपडे काढू लागली. यावेळी आरोपी अधिकाऱ्याने हातोडा काढत तिच्यावर वार करण्यास सुरुवात केली. 

हातोड्याने जीवे मारल्यानंतर अधिकाऱ्याने टॉयलेट क्लीनरने तिचा चेहरा जाळण्याचा प्रयत्न केला. मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर त्याने हातोडा रस्त्याच्या किनारी फेकून दिला होता. तसंच गाडी लपवली होती. श्रेयाचं सामान आणि घातलेले कपडे त्याने गाडीतच लपवून ठेवले होते. पोलीस चौकशीत आरोपीने लग्नाचा दबाव टाकत असल्याने हत्या केल्याचं कबूल केलं आहे.