PM नरेंद्र मोदींनी महात्मा गांधी आणि शास्त्री यांना वाहिली श्रद्धांजली

पाहा हा व्हिडिओ

PM नरेंद्र मोदींनी महात्मा गांधी आणि शास्त्री यांना वाहिली श्रद्धांजली  title=

मुंबई : राष्ट्रपती महात्मा गांधी यांची आज जयंती आहे. जगभरातील लोकं महात्मा गांधीच्या शिकवणीला आठवतात. 2 ऑक्टोबर रोजी आणखी एका महान व्यक्तीची जयंती असते ती व्यक्ती म्हणजे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटरपेजवरून या दोन महान व्यक्तींना व्हिडिओ संदेशद्वारे पोस्ट केलं आहे. 

बापूंवर तयार करण्यात आलेल्या या व्हिडिओवर मोदींनी लिहिलं आहे की, गांधी जयंतीनिमित्त राष्ट्रपतींना शत्-शत्-नमन. आज आपण परमपूज्य बापू यांची 150 वी जयंती साजरी कर आहोत. त्यांच स्वप्न पूर्ण करण्याची आपल्याकडे ही खूप मोठी संधी आहे. #Gandhi150 

तर तिथेच लाल बहादुर शास्त्री यांच्यासाठी त्यांनी एक पोस्ट लिहिली यामध्ये ते म्हणाले की, सौम्य व्यक्तीमत्व, कुशल नेतृत्व आणि बुलंद निर्णयक्षमता असलेल्या लाल बहादुर शास्त्री यांना त्यांच्या जयंती निमित्त विनम्र श्रद्धांजली. जय जवान - जय किसान

महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 मध्ये गुजरातमधील पोरबंदरमध्ये झाला. तर लाल बहादुर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 मध्ये उत्तर प्रदेशच्या मुगलसरायमध्ये झाला.