PM मोदी यांनी आईचा असा साजरा केला 100वां वाढदिवस, पाहा खास फोटो

 PM NARENDRA MODI : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा यांचा आज 100वां वाढदिवस आहे. पंतप्रधान मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. आज सकाळीच त्यांनी आपल्या मातोश्रींची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. 

Updated: Jun 18, 2022, 09:21 AM IST
PM मोदी यांनी आईचा असा साजरा केला 100वां वाढदिवस, पाहा खास फोटो title=

अहमदाबाद :  PM NARENDRA MODI : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा यांचा आज 100वां वाढदिवस आहे. पंतप्रधान मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. आज सकाळीच त्यांनी आपल्या मातोश्रींची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. (PM Narendra Modi meets mother in Gandhinagar on her 100th birthday) पंतप्रधानांनी आपल्या मातोश्रींचं सकाळीच पाद्यपूजन केले. त्यांच्यावर फुलांची बरसात केली. आज हिराबा यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त वडनगर भागातल्या हाटकेश्वर मंदिरात पूजेचं आयोजन करण्यात आले आहे. या पूजासोहळ्यात पंतप्रधान मोदीही सहभागी होतील. त्यानंतर एका रस्त्याचं नामकरणही पूज्य हिराबा मार्ग असं होणार आहे.

 

पीएम मोदी आईला भेटण्यासाठी गुजरातमधील गांधीनगर येथील त्यांच्या आईच्या घरी पोहोचले. यावेळी पंतप्रधान मोदींनी आईचे पाद्यपूजन केले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.

पंतप्रधान मोदींनी आई हीराबेन यांना वाढदिवसानिमित्त शाल भेट दिली.

पंतप्रधान मोदी यांनी आई हीराबेन यांच्या चरणांना स्पर्श करुन आशीर्वाद घेतले.

आईच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींनी आईचे पाद्यपूजन केले आणि डोळ्यांना चरणामृत लावले.

पीएम मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी पहिल्यांदा आईचा आशीर्वाद घेण्यासाठी ते घरी पोहोचलेत.

आईसोबत झालेल्या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी घरातील मंदिरात पूजा केली आणि प्रसाद दिला.

पंतप्रधान मोदी यांचे त्यांच्या आईसोबतचे भावनिक फोटोही यापूर्वी समोर आले आहेत. आईला भेटण्यासाठी ते अनेकदा गुजरातला जात असतात.