दहशतवाद्यांना शिक्षा देण्यासाठी जवानांना सरकारकडून खुली सूट- पंतप्रधान

महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधानांनी यवतमाळ येथे विविध योजनांचे उद्घाटन केले.

Updated: Feb 16, 2019, 12:08 PM IST
दहशतवाद्यांना शिक्षा देण्यासाठी जवानांना सरकारकडून खुली सूट- पंतप्रधान  title=

यवतमाळ : दहशतवाद्यांना शिक्षा देण्यासाठी जवानांना सरकारकडून खुली सूट​ आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधानांनी यवतमाळ येथे विविध योजनांचे उद्घाटन केले. केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत कामांचे भूमिपूजन मोदींचनी केले भूमिपूजन नांदेड इथल्या एकलव्य आदर्श निवासी शाळेचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या निवडक लाभार्थींच्या ई-गृहप्रवेशासाठी पंतप्रधानांच्या हस्ते लाभार्थींना घराच्या चावी प्रदान संगीता मंगाम व वैशाली येडे या लाभार्थी चावी प्रदान करण्यात आल्या.  अजनी(नागपूर) -पुणे हमसफर एक्सप्रेसलाही हिरवी झेंडा दाखवण्यात आला. 

या शहीदांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.  दहशतवाद्यांनी लपण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्यांना शिक्षा मिळणारच. आम्हाला आमच्या सैनिकांवर गर्व आणि विश्वास आहे. सुरक्षा विभागाला खुली सूट देण्यात आल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला. पाकिस्तान हे दहशतवादाचे दुसरे नाव आहे. धीर धरा, आपल्या जवानांवर विश्वास ठेवा असे आवाहन त्यांनी यावेळी नागरिकांना केले. पुलवामाच्या दहशतवाद्यांना शिक्षा कधी द्यायची ? कशी द्यायची ? हे सर्व आपले जवान योग्य वेळी ठरवतील असेही ते म्हणाले. 

यवतमाळची प्रगती देखील इथल्या रस्त्यांमधून दिसणार आहे. म्हणून याच्याशी संबंधित 500 कोटींच्या योजनांचे लोकार्पण करण्यात आल्याचे पंतप्रधान म्हणाले. यवतमाळच्या साडे चौदा हजार गरीबांच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले. 2022 पर्यंत प्रत्येक बेघराला पक्के घर देण्याचा निश्चय केला आहे आणि ते होणार म्हणजे होणारच. आतापर्यंत 1 कोटी घरे बनली आहेत. फडणवीस सरकारनेही 50 हजारहून जास्त घरे दिली आहेत. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत बनलेली घरे विश्वास तर देतच आहेत पण त्यांचा विश्वासही वाढवत आहेत.