नवी दिल्ली : भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पाकिस्तानचा बुरखा फाडला. सुषमा स्वराज यांच्या भाषणाचं सर्वत्र कौतुक होतंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वराज यांच्यावर स्तुतीसुमनं उधळलीत. स्वराज यांनी आपल्या भाषणाद्वारे देशाचं नाव जागतिक पातळीवर उंचावल्याचं मोदी यांनी सोशल मीडियावर म्हटलंय.
Incredible speech by EAM @SushmaSwaraj at the @UN! She has made India extremely proud at the world stage. https://t.co/nLI2CC2VBj #UNGA
— Narendra Modi (@narendramodi) September 23, 2017
EAM @SushmaSwaraj was insightful in identifying global challenges & strongly reiterated India's commitment to create a better planet. #UNGA
— Narendra Modi (@narendramodi) September 23, 2017
A strong message was given by @SushmaSwaraj Ji on the dangers of terrorism and why we have to unite and fight this menace. #UNGA
— Narendra Modi (@narendramodi) September 23, 2017
यूएनमध्ये सुषमा स्वराज यांचं भाषण अविश्वसनीय होतं... जागतिक मंचावर त्यांनी भारताची मान उंचावलीय. या भाषणातून वैश्विक आव्हानं ओळखण्याची स्वराज यांची दूरदृष्टी दिसून येतेय. तसंच यावेळी उत्तम विश्वनिर्मितीची भारताची बांधिलकी आणि दहशतवादविरोधी एकत्र येण्याचा संदेश सुषमांनी आपल्या भाषणातून दिल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय.