राष्ट्रगीताच्यावेळी पंतप्रधान मोदी झाले भावूक

काय म्हणाले मोदी 

राष्ट्रगीताच्यावेळी  पंतप्रधान मोदी झाले भावूक  title=

मुंबई : आज संपूर्ण देशात 72 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सकाळी 7.30 वाजता लाल किल्यावरून नागरिकांशी संवाद साधत आहेत. मोदी राजघाटवर पोहोचताच महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदरचे मोदी यांचे लाल किल्यावरील हे शेवटचे भाषण आहे. ध्वजारोहण केल्यानंतर 'जन गन मन' हे राष्ट्रगीत ऐकताना सर्व भारतीयांची छाती अभिमानाने फुलते तर दुसरीकडे हे राष्ट्रगीत ऐकताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भावुक झाले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावर ध्वजारोहण केलं. लाल किल्यावर तोफ्यांची सलामी देण्यात आली असून राष्ट्रगीत सादर करून धव्जारोहण करण्यात आलं. या प्रसंगी पंतप्रधान मोदी यांच्या कानावर राष्ट्रगीत डले आणि ते भावुक झाल्याचे दिसले. 

ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाआधी कवायत करण्यात आली यावेळी लोकांनी मोठी गर्दी केली आहे. लाल किल्ल्यावरूनच मोदी पाचवं आणि शेवटचं भाषण करत आहेत. तिन्ही सेना दलांचे प्रमुख या सोहळ्याला उपस्थित आहेत. लाल किल्ला परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनानिमित्तानं देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.