लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांची आरोग्य सुविधेसाठी 'आयुष्यमान योजने'ची घोषणा

पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी पाचव्यांदा लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत आहेत. 

Updated: Aug 15, 2018, 09:09 AM IST

नवी दिल्ली : भारताचा ७२ वा स्वातंत्र्यदिन दिवसाला पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्यावरून देशाला संबोधित करत आहेत. यापूर्वी मोदींनी राजघाटावर पोहचून महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी पाचव्यांदा लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण...

सर्जिकल स्ट्राईकचं मोदींकडून कौतुक

देशाच्या सर्जिकल स्ट्राईकनं शत्रुंना कायमचा धडा शिकवला

मोदींकडून लष्कर आणि नौदलाचं कौतुक

निर्णय घेण्यात राजकारण केलं जात नाही

जीएसटीमुळे व्यापाऱ्यांत विश्वास निर्माण झाला

गुंतवणूकदारांना भारताबद्दल विश्वास वाटतो

'ईज ऑफ डुईंग बिजनेस'मध्ये भारताची प्रगती

२०१३ नंतर भारताच्या विकासानं वेग घेतला

चार वर्षांत भारतानं खूप प्रगती केली

विमान खरेदीत देशाची प्रगती 

वन रँक वन पेन्शन योजना लागू केली

आंतरराष्ट्रीय पटलावर भारताचा दबदबा

जागतिक संस्थांमध्ये भारताला मानाचं स्थान

भारताच्या पासपोर्टची ताकद वाढली

खादीची विक्री वाढली

खादीमुळे गरिबांच्या घरात रोजगार

गरीबांच्या घरापर्यंत वीज पोहचली 

डिजिटल इंडियात तरुणांचा सहभाग

तीन लाख गावांत डिजिटल इंडिया

शास्त्रज्ञ तिरंगा घेऊन अंतराळात जाणार

स्वच्छता अभियानामुळे तीन लाख मुलं वाचली

गांधीजींच्या स्वप्नातले 'स्वच्छाग्रही' तयार केले

गांधीजींच्या स्वप्नातला स्वच्छ भारत तयार होईल

०२२ पर्यंत प्रत्येक भारतीय अंतराळात जाऊ शकेल

आजचा सूर्योद्य नवीन सूर्य घेऊन आलाय

द्रपूर जिल्ह्यातील छोट्या एव्हरेस्टवीराचं मोदींकडून कौतुक

मोदींकडून सर्व क्रांतीकारकांचं स्मरण 

स्वातंत्र्यानंतर मोठ्या प्रमाणात विमान खरेदी

देशातील बंद पडलेल्या सिंचन प्रकल्पांचं काम सुरू झालं

जनआरोग्य योजनेमुळे अनेक बेरोजगार हातांना काम मिळालं

आयुष्यमान योजना देशभरात लागू करणार

आरोग्य सुविधेसाठी मोदींची मोठी घोषणा

गरिबांना सशक्त बनवण्यासाठी योजनेचा फायदा होणार

२५ सप्टेंबरपासून देशातील १० कोटी कुटुंबांना फायदा

गरिबांवर मोफत उपचार होणार 

पाच लाखांपर्यंतचा विमा मिळणार

आत्तापर्यंत अनेक योजनांच्या घोषणा झाल्या पण लोकांपर्यंत पोहचल्या नाहीत

व्यवस्थेतील विकृती संपवणं लक्ष्य 

करदात्यांमुळे गरिबांसाठी योजना

२०१४ मध्ये करदात्यांची संख्या ४ कोटी आता ती ६.७५ कोटी आहे

तुमच्या टॅक्समुळे ३ लाख लोकांचं पोट भरतं 

कुणाचं तरी पोट भरल्याचं पुण्य करदात्यांना मिळतं

प्रामाणिक करदात्यांमुळे देशात योजना लागू होतात 

एक लक्ष्य साध्य करण्यासाठी देशाची वाटचाल सुरू 

जीएसटीमुळे अप्रत्यक्ष करदाते वाढले

रेशनचा काळा बाजार रोखला

तीन लाख संशयास्पद कंपन्या बंद झाल्या

सुप्रीम कोर्टात तीन महिला न्यायाधीश

सरपंच पदापासून संसदेपर्यंत देशात महिलांचं मोठं योगदान

संसदेत महिलांची संख्या जास्त

सर्वाधिक महिला असलेलं पहिलं सरकार 

राज्यघटना जपणं मोठी जबाबदारी

बलात्काऱ्यांना तातडीनं शिक्षा देण्याचं काम न्यायव्यवस्थेकडून सुरू 

मध्यप्रदेशच्या दोषीला केवळ पाच दिवसात फाशीची शिक्षा

मुस्लीम भगिनींवर अन्याय होणार नाही

मुलभूत सुविधा देण्यासाठी बांधील

भारत ना थकणार, ना झुकणार... कायम प्रगती करणार

माझ्या भारताला जगातल्या इतर देशांच्या पुढे न्यायचंय

कुपोषणाला हद्दपार करायचंय 

मेरे प्यारे देशवासियों....

अपने मन मे एक लक्ष्य लिए

मंजिल अपनी प्रत्यक्ष लिए 

हम तोड रहे है जंजिरे

हम बदल रहे है तस्वीरे

ये नवयुग है, ये नवभारत है

खुद लिखेंगे अपनी तकदीर

हम बदल रहे है तस्वीर

हम निकल पडे है प्रण करके

अपना तन-मन अर्पण करके

जिद है एक सूर्य उगाना है

अंबर से उँचा जाना है

एक भारत नया बनाना है