'देशाचे चौकीदार' साधणार खऱ्या चौकीदारांशी संवाद

'ऑडियो ब्रिज'च्या माध्यमातून मोदी हे खऱ्याखुऱ्या चौकीदारांशी संवाद साधणार आहेत

Updated: Mar 20, 2019, 11:02 AM IST
'देशाचे चौकीदार' साधणार खऱ्या चौकीदारांशी संवाद title=

नवी दिल्ली : 'मैं भी चौकीदार' हे कॅम्पेन सध्या भाजपा जोशात चालवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यानिमित्त देशभरातल्या खऱ्या चौकीदारांशी पंतप्रधान मोदी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कित्येक दिवसांनी आपलं दुर्मिळ असं मौनही सोडणार आहेत. देशभरातल्या चौकीदार म्हणून काम करणाऱ्या २५ लाख जणांशी पंतप्रधान थेट संवाद साधणार आहेत. 'ऑडियो ब्रिज'च्या माध्यमातून मोदी हे खऱ्याखुऱ्या चौकीदारांशी संवाद साधणार आहेत. त्याचसोबत होळीच्या शुभेच्छाही देतील. 

लोकसभा निडवणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ब्लॉग अकाऊंटवरून एक ब्लॉगही प्रकाशित करण्यात आलाय. या ब्लॉगमध्ये नरेंद्र मोदींनी देशवासियांना पुन्हा एकदा घराणेशाही आणि वोटबँकेचं राजकारण करणाऱ्यांचं राजकारण उधळून भाजप सरकारला बहुमतानं निवडून देण्याची विनंती केली. पंतप्रधान मोदींनी आपल्या ब्लॉगमध्ये २०१४ च्या ऐतिहासिक विजयाचा उल्लेख करत काँग्रेसवर जोरदार हल्ला केला. पंतप्रधान मोदींनी आपल्या या ब्लॉगमध्ये काँग्रेस सरकार दरम्यान झालेल्या भ्रष्टाचारासोबत एनडीए सरकारच्या कामकाजावर टीका केली.