पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे सध्या उत्तराखंड (uttarakhand) दौऱ्यावर आहेत. उत्तराखंड (uttarakhand) येथील केदारनाथ मंदिरात (kedarnath temple) त्यांनी पूजा केली. पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी भगवान शंकराचा रुद्राभिषेकही केला. यानंतर त्यांनी केदारनाथ (kedarnath) रोपवेची पायाभरणी केली. आदिगुरू शंकराचार्यांना पुष्पहार अर्पण केला. यावेळी पंतप्रधान मोदी हे खास पोशाखामध्ये दिसले. पंतप्रधानांनी घातलेल्या या पोशाखाची सर्वत्र चर्चा होत आहे. पंतप्रधान मोदींनी (PM Modi) परिधान केलेला ड्रेस हा हिमाचलचा (Himachal) खास 'चोला डोरा' पोशाख असल्याचे सांगण्यात येत आहे. हिमाचल प्रदेशातील एका महिलेने हाताने बनवून पंतप्रधानांना भेट दिल्याचे म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदी यांनी नुकताच हिमाचल (Himachal Pradesh) प्रदेशचा दौरा केला होता. यादरम्यान एका महिलेने त्यांना खास चोला डोरा पोशाख (chola dora) भेट दिला होता. चंबा (chamba) येथे राहणाऱ्या एका महिलेने स्वत:च्या हाताने तो बनवला आहे. त्यावर उत्कृष्ट अशी हस्तकलाही करण्यात आली आहे. पंतप्रधानांनी (PM Modi) या महिलेला वचन दिले होते की मी जेव्हाही थंड ठिकाणी जाईल तेव्हा हे नक्कीच घालेल. केदारनाथ धामच्या भेटीदरम्यान, पंतप्रधानांनी महिलेला दिलेले वचन पाळत हा खास पोशाख घातला आहे.
Uttarakhand | Prime Minister Narendra Modi reviews the progress of development works along Mandakini Asthapath and Saraswati Asthapath in Kedarnath during his visit pic.twitter.com/1jHP1eLAN4
— ANI (@ANI) October 21, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळीपूर्वी उत्तराखंडमध्ये पोहोचले आहेत. त्यांचा हा दौरा विशेष मानला जातो. पंतप्रधान राज्याला 3400 कोटींच्या योजना भेट देणार आहेत. नरेंद्र मोदी आज भारतातील शेवटचे गाव मान यालाही भेट देणार आहेत. जिथे ते एका जाहीर सभेला संबोधित करतील. हे गाव चीनच्या सीमेवर आहे. ते बद्री विशाल येथे रात्रीचा मुक्काम करतील.