ममतांची पंतप्रधानांकडे पश्चिम बंगालचे नाव बदलण्याची मागणी

 तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींची दिल्लीत भेट घेतली.

Updated: Sep 18, 2019, 09:51 PM IST
ममतांची पंतप्रधानांकडे पश्चिम बंगालचे नाव बदलण्याची मागणी  title=

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींची दिल्लीत भेट घेतली.लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि तृणमूलमधील संघर्ष शिगेला पोहोचला होता. त्यामुळे आजच्या ममता आणि मोदींच्या भेटीकडे विशेष लक्ष होतं. ममतांनी यावेळी पंतप्रधानांकडे पश्चिम बंगालचं नाव बदलण्याची मागणी केली. तसेच नवरात्रीनंतर पंतप्रधान मोदींना पश्चिम बंगालमध्ये येण्याचं आमंत्रणही ममतांनी दिले.

त्याचप्रमाणे जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या कोसळा खाणीचं उद्घाटन करण्याची विनंतीही ममतांनी यावेळी केली. पश्चिम बंगालसाठी केंद्र सरकारकडे १३, ५०० कोटींची मागणी करण्यात आली. तसंच गृहमंत्री अमित शाह यांनी वेळ दिल्यास त्यांचीही भेट घेण्याची इच्छा असलाचे ममता बॅनर्जी म्हणाल्या.