मंत्रिमंडळ विस्तारानंतर मोदींनी पहिल्यांदाच बोलावली कॅबिनेटची बैठक

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच विस्तारीत मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. ३ सप्टेंबरला झालेल्या विस्तारानंतर १२ सप्टेंबरला मोदी मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडेल.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 10, 2017, 07:22 PM IST
मंत्रिमंडळ विस्तारानंतर मोदींनी पहिल्यांदाच बोलावली कॅबिनेटची बैठक  title=

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच विस्तारीत मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. ३ सप्टेंबरला झालेल्या विस्तारानंतर १२ सप्टेंबरला मोदी मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडेल.

प्राप्त माहितीनुसार, या वेळी होणाऱ्या बैठकीस मंत्रिमंडळातील सर्व मंत्री उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत २०१९च्या लोकसभा निवडणुकीस डोळ्यासमोर ठेऊन कल्याणकारी योजना सुरू करण्यावर भर देण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

तीन सप्टेबरला झालेल्या मंत्रिमंडळी विस्तारानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची संख्या पंतप्रधानांसहीत ७६ इतकी झाली आहे. यात २७ कॅबिनेट मंत्री तर, ११ राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार) तसेच, ३७ राज्यमंत्री आहेत.