Modi Cabinet Expansion : पंतप्रधान मोदींनी नव्या मंत्र्यांना दिल्या 4 महत्वाच्या सूचना?

नव्या मंत्र्यांना मंत्रालयात जाण्याची वेळ मोदींनी ठरवून दिली

Updated: Jul 9, 2021, 07:09 AM IST
Modi Cabinet Expansion : पंतप्रधान मोदींनी नव्या मंत्र्यांना दिल्या 4 महत्वाच्या सूचना? title=

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर नवीन मंत्र्यांच्या टीमसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची बैठक संपली. बैठकीत मोदींनी हटवलेल्या मंत्र्यांच्या कामाचं कौतुक केलं. तसेच नव्या मंत्र्यांना काही महत्वाचे सल्ले आणि सूचना दिल्या. (PM Narendra Modi 4 important suggestions to the new ministers) 

मीडियाला विनाकारण प्रतिक्रिया देऊ नका 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जुन्या आणि नव्या अशा सगळ्याच मंत्र्यांना 'मीडियाला विनाकारण प्रतिक्रिया देऊ नका,'असा सल्ला दिला आहे. यापेक्षा आपल्या विभागाच्या कामाकडे जास्त लक्ष द्या. प्रत्येक प्रोजेक्टची टाइमलाइन तयार ठेवा. त्याचप्रमाणे ती टाइमलाइन पाळली जाते की नाही याकडे लक्ष ठेवा. तसेच प्रोजेक्ट दरम्यान येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करा. 

कोरोनाकाळात लोकांना मास्क लावण्यास जागरूक करा 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी म्हटलं की, गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा गर्दी वाढू लागली आहे. लोकं बिना मास्क फिरताना दिसत आहे. हे देशासाठी चांगल नाही. अजून कोरोना संपलेला नाही. मंत्र्यांनी याबाबत देशातील नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करावी. 

संपूर्ण ऊर्जा मंत्रालयातील कामात लावा 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाचा वाढता आकडा पाहता चिंता व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांना वेळेत कार्यालयात पोहोचण्याचा सल्ला दिला. आपली संपूर्ण ऊर्जा मंत्रालयाच्या कामात लावा, असा सल्ला दिला. 

तुमचं काम चमकू दे तुम्ही नाही 

पंतप्रधान मोदी यांनी मंत्र्यांना सल्ला दिला की,'तुमचं काम चमकू द्या, तुम्ही नाही.' गरीब कल्याण योजनांवर झपाट्याने काम करा. सामान्यांना लवकरात लवकर याचा फायदा व्हावा, असा सल्ला दिला आहे. सगळ्या मंत्र्यांनी सकाळी 9.30 वाजता कार्यालयात जाऊन कामकाजाला सुरूवात करा.