कोलकाता : पंतप्रधान मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी आज एकाच मंचावर दिसणार आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना देखील आज त्यांच्या सोबत एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये शांती निकेतनमध्ये विश्व भारती विश्वविद्यालयाच्या 49व्या पदवीदान सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान शेख हसीना सहभागी होणार आहेत.
#WATCH PM Narendra Modi arrives in Shanti Niketan to attend the convocation of Visva Bharati University, received by West Bengal CM Mamata Banerjee pic.twitter.com/dnDE1pZmyf
— ANI (@ANI) May 25, 2018
भारत आणि बांगलादेशच्या पंतप्रधान 'बांगलादेश भवन'चं देखील उद्घाटन करणार आहेत. याआधी आज एअरपोर्टवर मोदी पोहोचले तेव्हा एक वेगळं दृश्य पाहायला मिळालं. जेव्हा ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदींकडे येत होत्या तेव्हा त्यांनी त्यांना एका वेगळ्या रस्त्याने येण्याचा इशारा केला. कारण ममता बॅनर्जी जेथून येत होत्या तो रस्ता चांगला नव्हता.
West Bengal: PM Narendra Modi and Bangladesh PM Sheikh Hasina in #SantiNiketan. Both leaders will shortly inaugurate Bangladesh Bhavan pic.twitter.com/4cIclroKUS
— ANI (@ANI) May 25, 2018
पंतप्रधान मोदींनी इशारा करत दुसऱ्या बाजूने येण्यास ममता बॅनर्जी यांना सांगितलं. ममता बॅनर्जी त्यांच्याकडे पोहोचताच त्यांनी पीएम मोदींना शाल भेट करुन त्यांचं स्वागत केलं. प्रोटोकॉलनुसार पंतप्रधान जर राज्यात येत असतील तर त्यांच्या स्वागतासाठी राज्याच्या मुख्यमंत्री आणि गव्हर्नर यांना उपस्थित राहावं लागतं.