अहमदाबाद : मुंबई-अहमदाबाद या देशातील पहिल्या बुलेट ट्रेनच्या कामाचं भूमिपूजन थोड्याच वेळात करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जापानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाचं भूमिपूजन होणार आहे. गुजरातमधील साबरमती येथे हा कार्यक्रम होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही यासाठी उपस्थित राहणार आहेत.
या बुलेट ट्रेनच्या कामासाठी १ लाख कोटी रुपये खर्च येणार आहे. या खर्चापैकी महाराष्ट्र आणि गुजरात सरकार प्रत्येकी २५ टक्के वाटा उचलणार आहे. तर, केंद्र सरकार ५० टक्के देणार आहे. त्यासोबतच या प्रकल्पासाठी ८८ हजार कोटी रुपये जपानं ८८ हजार कोटीचं कर्ज देणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाची आजपासून सुरुवात होणार आहे. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी तब्बल १० हजार नागरिक उपस्थित राहणार आहेत. यासाठी साबरमती रेल्वे स्टेडिअम सजविण्यात आलं आहे. तसचं संपूर्ण कार्यक्रम हा लाईव्ह टेलिकास्ट करण्यात येणार असून मोठ-मोठ्या स्क्रिन्स लावण्यात आल्या आहेत.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या बीकेसीत बुलेट ट्रेनचं स्टेशन असणार आहे. बुलेट ट्रेनच्या भूमिगत स्थानकासाठी वांद्रे-कुर्ला संकुलातील वित्तीय सेवा केंद्र परिसरातील ०.९ हेक्टर जागा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.