नोव्हेंबरपर्यंत ८० कोटी भारतीयांना मोफत रेशन दिलं जाणार : पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी यांनी आज देशाला संबोधिक केले.

Updated: Jun 30, 2020, 05:04 PM IST
नोव्हेंबरपर्यंत ८० कोटी भारतीयांना मोफत रेशन दिलं जाणार : पंतप्रधान मोदी title=

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी यांनी देशाला संबोधित करत असताना एक मोठी घोषणा केली आहे. नोव्हेंबरपर्यंत राशन मोफत दिलं जाणार आहे. तसेच त्यांनी शेतकरी आणि टॅक्स भरणाऱ्यांचे ही आभार मानले. देशात कोरोनाच्या काळात अनलॉक-१ नंतर बेजबाबदारपणा वाढल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केला.

पंतप्रधान मोदींनी म्हटलं की,... 

'कोरोनाच्या विरोधात लढता लढता आपण आता अनलॉक २ मध्ये प्रवेश करत आहोत. सोबतच सर्दी, ताप येतात अशा वातावरणात देखील प्रवेश करत आहोत. देशाच्या नागरिकांना विनंती आहे की, त्यांनी आपली काळजी घ्यावी. इतर देशांच्या तुलनेत भारतात परिस्थिती नियंत्रणात आहे. वेळेत लॉकडाऊन झाल्याने लाखो लोकांचे प्राण वाचले आहेत. पण देशात अनलॉक १ नंतर लोकं आत दुर्लक्ष करत आहेत. आज अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. पण बेजबाबदारपणा वाढला आहे.'

'कंटेन्मेंट झोनमध्ये विशेष काळजी घ्यावी लागेल. जे लोकं नियमांचं पालन करत नाही अशा लोकांना टोकावं लागेल. एका देशाच्या पंतप्रधानांवर १३ हजाराचा दंड लागला. कारण त्यांनी मास्क लावला नव्हता. स्थानिक प्रशासनाने देखील असंच काम केलं पाहिजे. भारतात गावाचा प्रधान असो की देशाचा पंतप्रधान, कोणीही नियमाच्या वर नाही. लॉकडाऊनमध्ये देशाची प्राथमिकता होती की कोणत्याही गरीबाच्या घरात चूल पेटू नये अशी परिस्थिती येऊ नये. इतक्या मोठ्या देशात कोणताचा व्यक्ती उपाशी झोपू नये म्हणून सगळ्यांनी मदत केली.'

'जनधन खात्यात पैसे जमा करण्यात आले. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले. गावांमध्ये श्रमिकांना रोजगार देण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अभियान सुरु झालं आहे. पण एक मोठी गोष्ट अशी आहे ज्यामुळे जग देखील हैराण आहे. ती म्हणजे, कोरोनासोबत लढताना ८० कोटीपेक्षा अधिक लोकांना राशन आपण मोफत दिलं गेलं आहे.'

'वर्षाऋतू दरम्यान आणि त्यानंतर कृषी क्षेत्रात जास्त काम होतं. इतर क्षेत्रात थोडी सुस्ती असते. जुलैपासून सणांचं वातावरण देखील सुरु होतं. त्यामुळे खर्च देखील वाढतो. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा विस्तार दिवाळी आणि छटपुजेपर्यंत म्हणजेच नोव्हेंबरपर्यंत केला जाईल. नोंव्हेंबर पर्यंत मोफत राशन दिलं जाईल. ८० कोटीहून अधिक लोकांना ५ किलो गहू किंवा तांदुळ मोफत दिलं जाईल. सोबतच एक किलो चणा देखील दिलं जाईल. ९० हजार कोटींचा खर्च याला येणार आहे. मागील ३ महिने पकडून दीड लाख कोटीवर हा खर्च जातोय.

'अनेक राज्यांनी चांगलं काम केलं आहे. पूर्ण भारतात एकच रेशन कार्डची व्यवस्था होत आहे. वन नेशन वन रेशन कार्डची देखील लवकरच व्यवस्था केली जाईल. ज्यामुळे देशाच्या गरीबांना फायदा होईल शेतकरी आणि इमानदारपणे टॅक्स भरणाऱ्यांमुळेच देश ही मदत करु शकत आहे. इतक्या मोठ्या संकटात ही देशातील गरीबाला मदत करता येत आहे. सगळ्या शेतकऱ्यांचं आणि टॅक्स भरणाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो. सगळ्याना सशक्त करण्यासाठी आम्ही काम करत राहू. आत्मनिर्भर भारतासाठी दिवसरात्र एक करु. लोकलसाठी वोकल होऊया. १३० कोटी देशवासियांना संकल्पासह सगळ्यांना प्रार्थना करतो की, सगळ्यांनी सोशल डिस्टंसिंगचं पालन करावे. मास्क वापरा.'