लोकप्रिय नेत्यांच्या यादीत मोदी तिसरे, ट्रम्प-जिनपिंगला टाकले मागे

दावोस(स्वित्झर्लंड) वर्ल्ड इकॉनॉमिक्स फोरमच्या बैठकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी गुडन्यूज आलीये. एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणानुसार पंतप्रधान मोदी हे जगातील तिसऱे लोकप्रिय नेते बनलेत. गॅलप इंटरनॅशनलने हे सर्वेक्षण केलेय.

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Jan 12, 2018, 11:22 AM IST
लोकप्रिय नेत्यांच्या यादीत मोदी तिसरे, ट्रम्प-जिनपिंगला टाकले मागे title=

नवी दिल्ली : दावोस(स्वित्झर्लंड) वर्ल्ड इकॉनॉमिक्स फोरमच्या बैठकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी गुडन्यूज आलीये. एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणानुसार पंतप्रधान मोदी हे जगातील तिसऱे लोकप्रिय नेते बनलेत. गॅलप इंटरनॅशनलने हे सर्वेक्षण केलेय.

या सर्वेक्षणानुसार पंतप्रधान मोदींनी लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना मागे टाकलंय. गॅलप इंटरनॅशनलने केलेल्या या सर्वेक्षणात विविध देशांतील सुमारे ५३ हजार ७६९ लोकांनी आपली याबाबत मते मांडली.

या लोकांना विचारण्यात आलेल्या प्रश्नामध्ये त्यांना लोकप्रिय नेत्यांबाबतचे मत विचारण्यात आले. यावेळी ३० टक्के लोकांनी मोदींच्या बाजूने मत व्यक्त केले तर २२ टक्के लोकांनी त्यांच्याविरोधात मत व्यक्त केले. यानुसार पंतप्रधान यांचा स्कोर +8 आहे आणि ते तिसऱ्या स्थानावर आहेत.

पहिल्या दुसऱ्या स्थानावर फ्रान्स-जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष

या सर्वेक्षणात पंतप्रधान मोदी ८ अंकांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. तर ७ अंकांसह चौथ्या स्थानावर ब्रिटनच्या पंतप्रथदान थेरेसा मे आहेत. या यादीत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग ६ अंकांसह पाचव्या स्थानावर आहेत. सर्वेक्षणात सर्वाधिक २१ अंकांसह पहिल्या स्थानावर फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन आहेत. तर जर्मनीचे चान्सलर अँजेलो मार्केल २० अंकांसह दुसऱ्या स्थानावर आहेत.

पुतिन सहाव्या तर ट्रम्प ११व्या स्थानावर

या सर्वेक्षणात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन सहाव्या, सौदी अरेबियाचे राजे सलमान हिन अब्दुल्लाजीज साऊ सातव्या, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आठव्या स्थानावर आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प ११व्या स्थानावर आहेत.