दहशतवादाविरोधात महाबली एकत्र, पाकिस्तानची उडाली झोप

दुसरीकडे भारतीय लष्कराचा पाकिस्तानला इशारा

Updated: Oct 12, 2019, 11:32 AM IST
दहशतवादाविरोधात महाबली एकत्र, पाकिस्तानची उडाली झोप title=

चेन्नई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या चर्चेचा मुख्य गाभा हा जागतिक दहशतवाद हा आहे. या चर्चेमुळे पाकिस्तानात दहशतवाद्यांची आणि त्यांना पोसणाऱ्यांची झोप उडाली असेल. त्यातच भारतीय लष्कराने पाकिस्तानला मोठा इशारा दिला आहे. दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानची झोपच उडाली आहे. पाकिस्तानात घुसून ५०० दहशतवादी मारू असा इशारा भारतीय लष्कराने पाकिस्तानला दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मैत्रीची ही दृष्य जगाने पाहिली. दहशतवादाला थारा देणारा पाकिस्तानही या चर्चेवर बारकाईने लक्ष ठेऊन आहे. त्यातच भारतीय हद्दीत घुसखोरीच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना उद्देशून लष्कराने पाकिस्तानला तंबी दिलीय. 

काही दिवसांपूर्वी संरक्षणमंत्र्यांनीही पाकिस्तानला फ्रान्समधून चांगलच सुनावलं होतं. यापुढे जग्वारवरून नाही, राफेलवरून कारवाई करू असं राजनाथसिंह म्हणाले. 

पाकिस्तान अजूनही दहशतवादाला मदत करत राहिला तर पाकिस्तान पारंपरिक मित्र चीनलाही गमवून बसेल. दक्षिण आशियातली समीकरणं बदलतायत. पाकिस्तानने वेळीच शहाणं होणं गरजेचं आहे.