PM Kisan Yojana : 'या' दिवशी येणार योजनेचा 12 वा हफ्ता

12 वा हफ्ता केव्हाही शेतकऱ्यांच्या खात्यावर (pm kisan yojana) ट्रान्सफर केलं जाऊ शकतं. 

Updated: Oct 1, 2022, 08:23 PM IST
PM Kisan Yojana : 'या' दिवशी येणार योजनेचा 12 वा हफ्ता

नवी दिल्ली :  पीएम किसान योजनेंतर्गत (PM Kisan Yojana) मोदी सरकारकडून (Central Government) शेतकऱ्यांना (Farmers) आर्थिक मदत दिली जाते. शेतकर्‍यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा त्यामागचा उद्देश आहे. योजनेंतर्गत पीएम सन्मान निधी 2-2 हजार रुपयांची रक्कम नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षातून 3 वेळा पाठवली जाते. अशाप्रकारे शेतकऱ्यांना वर्षाला एकूण 6 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते. (pm kisan yojana 12th installment is coming on this day)

पीएम किसान योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत 11 हप्त्यांचा लाभ देण्यात आला आहे. आता शेतकरी 12 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. याबाबत मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की,  12 वा हफ्ता केव्हाही शेतकऱ्यांच्या खात्यावर ट्रान्सफर केलं जाऊ शकतं. एका मीडिया रिपोर्टनुसार, उद्या म्हणजेच 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त शेतकऱ्यांना 12व्या हप्त्याची भेट मिळू शकते. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 

पीएम किसान योजनेअंतर्गत अनेक लोक बनावट शेतकरी बनून गैरफायदा घेत आहेत. अशा गैरफायदा घेणाऱ्यांची नावं लाभार्थी यादीतून वगळली जात आहेत. अशा परिस्थितीत तुम्हाला 12 व्या हप्त्याचा लाभ मिळेल की नाही, तुम्ही या मार्गाने जाणून घेऊ शकता. PM Kisan च्या अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ला भेट द्या. येथे शेतकरी कॉर्नरखाली लाभार्थी यादीचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर एक नवीन पेज उघडेल. त्यात प्रथम राज्याचे नाव, नंतर जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा. विचारलेली सर्व माहिती भरा आणि Get Report वर क्लिक करा. यानंतर पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची यादी उघडेल. येथे तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.