PM Kisan: सरकारने PM किसान योजनेत केले मोठे बदल! जाणून घ्या

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 10 वा हप्ता टाकण्यापूर्वी काही बदल करण्यात आले आहेत.

Updated: Nov 21, 2021, 03:54 PM IST
PM Kisan: सरकारने PM किसान योजनेत केले मोठे बदल! जाणून घ्या title=

नवी दिल्ली: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मोदी सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 9 हप्ते पाठवले आहेत. आता शेतकऱ्यांना दहाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. मात्र त्याआधी या योजनेत काही मोठे बदल करण्यात आले आहेत.

धारण मर्यादेबाबत निर्णय

पीएम किसान योजनेच्या सुरुवातीला केवळ तेच शेतकरी पात्र मानले जात होते, ज्यांच्याकडे 2 हेक्टर किंवा 5 एकर शेती होती. पण आता मोदी सरकारने ही सक्ती काढून टाकली आहे जेणेकरून 14.5 कोटी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळू शकेल.

रेशन कार्ड अपलोड 

आता पंतप्रधान किसान योजनेंतर्गत नवीन नोंदणीसाठी शिधापत्रिका सादर करणे आवश्यक करण्यात आले आहे. यासोबतच रेशनकार्डची सॉफ्ट कॉपीही पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहे.

तपासानंतरच पती, पत्नी किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे. जर तुम्ही पीएम किसानमध्ये आधीच नोंदणी केली असेल, तर तुम्हाला रेशन कार्ड नंबर वेबसाइटवर अपलोड करावा लागेल.

आधार कार्ड आवश्यक

ज्या शेतकऱ्यांकडे आधार आहे त्यांनाच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळेल. आधारशिवाय तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. सरकारने लाभार्थ्यांना आधार कार्ड अनिवार्य केले आहे.

नोंदणी सुविधा

जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी मोदी सरकारने लेखापाल आणि कृषी अधिकाऱ्यांच्या फेऱ्या मारण्याची सक्ती रद्द केली आहे. आता शेतकरी घरबसल्या सहज नोंदणी करू शकतात.

जर तुमच्याकडे आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि बँक खाते क्रमांक असेल तर तुम्ही pmkisan.nic.in वर फार्मर्स कॉर्नरवर जाऊन स्वतःची नोंदणी करू शकता. तसेच काही चूक झाली असेल तर ती तुम्ही स्वतः दुरुस्त करू शकता.

आता तुमची स्थिती जाणून घ्या

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सरकारने सर्वात मोठा बदल केला आहे की नोंदणी केल्यानंतर तुम्ही तुमची स्थिती स्वतः तपासू शकता. आता तुम्ही तुमच्या स्वतःच्या अर्जाची स्थिती तपासू शकता, तुमच्या बँक खात्यात किती हप्ता आला आहे.

किसान क्रेडिट कार्ड

आता या योजनेअंतर्गत किसान क्रेडिट कार्ड (KCC) देखील जोडण्यात आले आहे. पीएम किसानचे लाभार्थी सहजपणे KCC बनवू शकतात. शेतकऱ्यांना KCC वर 4 टक्के दराने 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्जही मिळते.

मानधन योजनेचे फायदे

पीएम-किसान सन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना यापुढे पीएम किसान मानधन योजनेसाठी कोणतीही कागदपत्रे द्यावी लागणार नाहीत. 

या योजनेंतर्गत, शेतकरी पीएम-किसान योजनेतून मिळणाऱ्या लाभांमधून थेट योगदान देऊ शकतात. पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सर्व प्रकारे लाभ देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

Business News In marathi, PM Kisan Samman Nidhi, PM Kisan Samman Nidhi Yojana,