मुंबई : आधार कार्डधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) देशभरात 166 स्वतंत्र आधार नोंदणी आणि अपडेट केंद्रे उघडण्याच्या तयारीत आहे. UIDAI ने एक निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली आहे. याचे सध्या, 166 पैकी 55 आधार सेवा केंद्रे (ASKs) कार्यरत आहेत. याशिवाय बँका, पोस्ट ऑफिस आणि राज्य सरकारांद्वारे 52 हजार आधार नोंदणी केंद्रे चालवली जात आहेत.
UIDAI ने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, UIDAI आता 122 शहरांमध्ये 166 सिंगल आधार नोंदणी आणि अपडेट केंद्रे उघडण्याची योजना आखत आहे. आधार सेवा केंद्रे आठवड्याचे सातही दिवस काम करतात. आधार केंद्रांनी आतापर्यंत दिव्यांगांसह ७० लाख लोकांच्या गरजा पूर्ण केल्या आहेत.
मॉडेल A च्या आधार सेवा केंद्रांमध्ये (Model-A ASKs) दररोज 1 हजार नावनोंदणी आणि अपडेट विनंत्या हाताळण्याची क्षमता आहे. त्याच वेळी, मॉडेल-बी (Model-B ASKs) 500 आणि Model-C (Model-C ASKs) 250 मध्ये नावनोंदणी आणि अद्यतन विनंत्या पूर्ण करण्याची क्षमता आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की UIDAI ने आतापर्यंत 130.9 कोटी लोकांना आधार क्रमांक दिला आहे.
तुमच्या माहितीसाठी, आधार सेवा केंद्र प्रायवेटमध्ये उपलब्ध नाही. म्हणजेच, आधार सेवा फक्त बँका, पोस्ट ऑफिस, कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC), राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांचे कार्यालय आणि UIDAI द्वारे संचालित आधार सेवा केंद्रामध्ये उपलब्ध आहेत.
इंटरनेट कॅफे आधारशी संबंधित समान सेवा देतात, जी UIDAI सामान्य माणसाला देते. आधार कार्डमध्ये फक्त नाव, पत्ता, जन्मतारीख किंवा इतर तपशील दुरुस्त करणे, फोटो बदलणे, पीव्हीसी कार्ड प्रिंट करून घेणे, सामान्य आधार कार्ड मागणे इत्यादी सुविधा तेथे उपलब्ध आहेत.
UIDAI द्वारे आधारमध्ये कोणत्याही दुरुस्तीसाठी किंवा PVC कार्ड मिळविण्यासाठी निर्धारित शुल्क 50 रुपये आहे, परंतु, कॅफे 70 ते 100 रुपये आकारते. ज्यामुळे तेथे आपण काम करुन घेतलं की अशा कामांसाठी आपल्याला 30 ते 50 किंवा 100 रुपये जास्तीचे भरावे लागतात.