हा वाजव अजून जोरात!! रस्त्यावर भोंगा वाजवणाऱ्यांना पोलिसांचे त्यांच्याच भाषेत उत्तर

पोलिसांच्या या कृतीचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे

Updated: Oct 8, 2022, 02:04 PM IST
हा वाजव अजून जोरात!! रस्त्यावर भोंगा वाजवणाऱ्यांना पोलिसांचे त्यांच्याच भाषेत उत्तर  title=

गणेशोत्सव (ganeshotsav) किंवा नवरात्रोत्सवात (navratri) कार्यक्रमांमध्ये तुम्ही काही लोकांना भोंगे (Horn) वाजवताना अनेकदा पाहिला असेल. रस्त्यावरून चालताना अनेक तरुण या भोंग्यामधून मोठा आवाज करतात आणि यातून त्यांना आनंद मिळतो. त्याना तो भोंग्याचा (Horn) आवाज आवडतो की नाही, ते तेथच सांगतील. पण आजूबाजूच्या लोकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. अनेकवेळा हा आवाज असह्य होतो. या भोंग्यांमुळे ध्वनी प्रदूषणही (noise pollution) वाढते. असाच भोंगा वाजवणाऱ्या दोन तरुणांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल होत आहे. मात्र असे भोंगे वाजवणाऱ्या तरुणांना पोलिसांनी (Police) चांगलीच अद्दल घडवलीय. पोलिसांच्या या कृतीचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) जबलपूरचा आहे. यामध्ये दसऱ्याच्या (dussehra) कार्यक्रमात काही तरुण रस्त्यावरून फिरताना भोंगे (Horn) वाजवताना पकडले जातात. पोलिसांनाही त्यांना त्यांच्याच भाषेत समजावून सांगायचे होते. म्हणून पोलिसांनी एक अतिशय अनोखा मार्ग शोधून काढला. पोलिसांनी त्या मुलांना पकडले आणि त्यांना एकमेकांच्या कानात भोंगा वाजवायला सांगितले. व्हिडीओमध्ये एक मुलगा त्याच्या मित्राच्या कानाजवळ भोंगा वाजवताना दिसत आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या लोकांकडून शेअर केला जात आहे. @BiharTeacherCan नावाच्या युजरने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना युजरने, और बजाओ भोपू, असे म्हटलं आहे. 27 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये पोलीस कर्मचारी सायरन वाजवताना पकडलेल्या मुलांना एकमेकांच्या कानात भोंगा वाजवयाला सांगत आहेत.

त्यानंतर पोलिसांनी दोन मुलांना कान पकडून उठाबश्या काढायला लावल्या. त्यानंतर त्यांना इशारा देऊन सोडले.  ध्वनिप्रदूषणात महत्त्वाची भूमिका बजावणारे असे भोंगे आपल्या कानांसाठी खूप हानिकारक आहेत. त्यांचा आवाज अगदी ट्रकच्या हॉर्नसारखा असतो. त्यामुळे अशा भोंग्याचा वापर टाळण्याचा प्रयत्न करायला हवा.