मुलीच्या लव्हमॅरेजमुळे नेत्याचा संताप, वडिलांपासून जीवाला धोका असल्याचा दावा

नेत्याच्या मुलीचं पळून लग्न, जीवाला धोका असल्याचं सांगत पतीच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून मागणी   

Updated: Mar 9, 2022, 12:26 PM IST
मुलीच्या लव्हमॅरेजमुळे नेत्याचा संताप, वडिलांपासून जीवाला धोका असल्याचा दावा title=

बंगळुरू : भारतीय संविधानात प्रत्येला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. अशाचं काही गोष्टींचा दाखला देत एका हाय प्रोफाईल नेत्याच्या मुलीने वडिलांपासून आणि नातेवाईकांपासून जीवाला धोका अल्याचा दावा केला आहे. ज्यामुळे नेत्याच्या मुलीने दुसऱ्या राज्यातील पोलिसांकडून सुरक्षा मागितली आहे. तामिळनाडू सरकारमधील  मंत्री पीके शेखर बाबू यांची नवविवाहित मुलगी आणि जावाई यांनी बंगळुरू पोलिसांकडून सुरक्षेची मागणी केली आहे. 

'टाइम्स ऑफ इंडिया'मध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार पीके शेखर बाबू तामिळनाडू सरकारमधील मंत्री आहेत. त्यांची मुलगी जयकल्याणीने वडिलांवर अनेक आरोप केले आहेत. ती म्हणते की तिला आणि तिच्या पतीला वडिलांपासून धोका आहे.

तमिलनाडु के मंत्री की बेटी ने की 'लव मैरिज', पिता से बताया जान का खतरा; मांगी सुरक्षा

जयकल्याणी पत्रकारांना सांगितलं की, 'मी सतीश कुमारसोबत लग्न केलं आहे. आम्ही गेल्या 6 वर्षांपासून एकत्र आहोत. आता मी तामिळनाडूमध्ये जावू शकत नाही. माझ्या पतीच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे आम्हाला पोलिसांकडून सुरक्षा हवी आहे...'

जयकल्याणीने एक व्हिडीओ पोस्ट करत सर्व आपल्या भावना मांडल्या आहेत. जयकल्याणीच्या म्हणण्यानुसार आम्ही दोघांनी कुटुंबाच्या विरोधात जावून लग्न केलं आहे. माझ्या आई-वडिलांना माझं लग्न मान्य नाही. 

काही महिन्यांपूर्वी सतीशने मला लग्नाची मागणी घातल्यानंतर तामिळनाडू पोलिसांनी दोन महिन्यांसाठी त्याला बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचे, जयकल्याणी यांनी सांगितले.

रायचूर येथील हलस्वामी मठात विवाह
सतीश आणि जयकल्याणी यांचा सोमवारी कर्नाटकातील रायचूर येथील हलस्वामी मठात हिंदू रितीरिवाजांनुसार विवाह झाला. त्याचवेळी मंत्री पीके शेखर बाबू यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे की त्यांची मुलगी बेपत्ता झाली असून तिचे अपहरण झाल्याचा त्यांना संशय आहे.