Petrol-Diesel च्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे दर

Petrol-Diesel Rate Today : पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात.  पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या. 

Updated: Oct 16, 2022, 07:53 AM IST
Petrol-Diesel च्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे दर title=

Petrol-Diesel Price on 16 October 2022: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत आज कोणताही बदल झालेला नाही. याआधी शनिवारी कच्च्या तेलाच्या (crude oil) किमतीत घसरण झाली होती. ब्रेंट क्रूड 91.63 डॉलर प्रति बॅरल आणि डब्ल्यूटीआय 85.61 डॉलर प्रति बॅरलवर विकले जात आहे. इथे सरकारी तेल कंपन्यांनी देशात पेट्रोल आणि डिझेलचे (petrol-diesel rate) नवे दर जाहीर केले आहेत. मात्र, येथेही दरात फारसा बदल झालेला नाही. (Petrol diesel rate update)

या शहरात पेट्रोल-डिझेलचे दर वाढले

झारखंडमध्ये पेट्रोल 0.55 रुपयांनी वाढून 100.76 रुपये आणि डिझेल 95.55 रुपयांवर पोहोचले आहे. महाराष्ट्रात पेट्रोल 0.49 रुपयांनी 106.45 रुपये आणि डिझेल 92.96 रुपयांनी महागले आहे. याशिवाय हिमाचल प्रदेशमध्ये पेट्रोलची किंमत 0.87 रुपयांनी घसरून 95.06 रुपये प्रति लिटरवर आली आहे. तर डिझेल 0.74 रुपयांनी स्वस्त होऊन 81.41 रुपये प्रतिलिटर झाले आहे. पंजाब, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये इंधनाची किंमत कालच्या सारखीच आहे. देशातील दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या चार महानगरांमध्ये किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

- दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
- कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
- चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

या शहरांमध्येही नवीन दर सुरू

- नोएडामध्ये पेट्रोल 96.92 रुपये आणि डिझेल 90.08 रुपये प्रति लिटर झाले आहे.
- गाझियाबादमध्ये 96.58 रुपये आणि डिझेल 89.75 रुपये प्रति लिटर झाले आहे.
- लखनौमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर झाले आहे.
- पाटण्यात पेट्रोल 107.48 रुपये आणि डिझेल 94.26 रुपये प्रति लिटर झाले आहे.
- पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर झाले आहे.

दररोज सकाळी 6 वाजता नवे दर जाहीर

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

SMS द्वारे जाणून आजचे दर

पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol-Diesel Rate) दैनंदिन दर तुम्हाला एसएमएसद्वारेही कळू शकतात. इंडियन ऑइलचे (Indian Oil) ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 क्रमांकावर आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत शोधू शकतात.