Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? तुमच्या शहरातील आजचे दर येथे पाहा...

Petrol Diesel Price Today : तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. परिणामी तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले की महाग? हे जाणून घ्य.. तर सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींमध्येही बदल..

Updated: Mar 30, 2023, 08:17 AM IST
Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? तुमच्या शहरातील आजचे दर येथे पाहा... title=
Petrol Diesel Price on 30 March 2023

Petrol Diesel Price on 30 March 2023 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहेत. अशा परिस्थितीत आज अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) घट नोंदवली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज (30 March 2023) सकाळी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींमध्येही बदल दिसून येत आहेत. तर आज नोएडामध्ये पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel Price) स्वस्त झाले. तर गाझियाबादमध्ये त्याचे दर वाढताना दिसत आहेत. लखनौमध्ये आज तेलाच्या किरकोळ किंमतीतही वाढ झाली आहे.  

पाहा मुंबईतील पेट्रोलचे दर 

तर राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरवर उपलब्ध आहे. मुंबईत (mumbai Petrol Rate) पेट्रोलचा दर 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर 106.03 रुपये तर डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्येही पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.

या शहरात स्वस्त पेट्रोल-डिझेल

नोएडामध्ये पेट्रोल 28 पैसे आणि डिझेल 26 पैसे स्वस्त दराने 96.64 रुपये आणि 89.82 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. तर गुरुग्राममध्ये पेट्रोल 7 पैसे स्वस्त आणि डिझेल 7 पैसे प्रति लीटर 96.77 रुपये आणि 89.65 रुपये स्वस्त विकले जात आहे. झारखंडची राजधानी रांचीमध्ये पेट्रोल 1.23 रुपये स्वस्त आणि डिझेल 1.22 रुपये प्रति लिटर 99.84 रुपये आणि 95.51 रुपये प्रति लीटर विकले जात आहे. त्याचवेळी आज काही शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही वाढ नोंदवली जात आहे.   

वाचा : हवामानात पुन्हा बदल, पावसाची शक्यता

या शहरात महाग पेट्रोल-डिझेल 

राजस्थानच्या जयपूरमध्ये पेट्रोल 19 पैसे आणि डिझेल 17 पैशांनी महागले असून 108.67 रुपये आणि 93.89 रुपये प्रति लीटर आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पेट्रोल 14 पैसे आणि डिझेल 13 पैसे प्रति लीटर 96.57 रुपये आणि 89.76 रुपये महागले आहे. मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये पेट्रोल 33 पैसे आणि डिझेल 30 पैशांनी महागले आहे. 

शहर डिझेल पेट्रोल
दिल्ली 89.62 96.72
मुंबई 94.27 106.31
कोलकाता 92.76  106.03
चेन्नई 94.24 102.63 

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर 

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

घरबसल्या चेक करा नवे  दर 

तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात.  त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.