कुठे स्वस्त तर कुठे महाग झाले पेट्रोल-डिझेल, जाणून घ्या तुमच्या शहरात काय आहे दर

Petrol-Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत थोडा चढ-उतार झाला आहे, जरी त्याचा प्रभाव भारतातील तेल कंपन्यांमध्ये  फारसा दिसून आला नाही.

आकाश नेटके | Updated: Aug 8, 2023, 08:48 AM IST
कुठे स्वस्त तर कुठे महाग झाले पेट्रोल-डिझेल, जाणून घ्या तुमच्या शहरात काय आहे दर title=

Petrol-Diesel Price Today on 8 Aujust : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत थोडीशी घसरण झाली. मात्र त्याचा भारतातील तेलाच्या किमतीवर फारसा परिणाम झालेला नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरही तेलाच्या किमतीत बदल झाला आहे. डब्ल्यूटीआय क्रूड 0.41 डॉलरने वाढून 82.35 प्रति बॅरल विकले जात आहे. ब्रेंट क्रूड 0.38 डॉलरवर 85.72 डॉलर प्रति बॅरल विकले जात आहे. 2022 मध्ये शेवटीच तेलाच्या किमतीत सर्वात मोठा बदल दिसून आला होता. तेल कंपन्या रोज सकाळी सहा वाजता तेलाच्या किमती जाहीर करतात. देशातील तेल विपणन कंपन्यांनी 8 ऑगस्ट रोजी पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol-Diesel Price) नवीनतम दर जाहीर केले आहेत. देशभरातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. 

भारतातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलने पार केला 100 रुपयांचा टप्पा 

राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यांसारख्या देशातील अनेक राज्यांमध्ये अनेक ठिकाणी पेट्रोलचा दर 100 रुपये प्रति लिटरपेक्षा जास्त आहे. मुंबई, श्रीगंगानगर आणि भोपाळमध्ये पेट्रोलबद्दल बोलायचे झाले तर येथे 1 लिटर पेट्रोल 100 रुपयांपेक्षा जास्त किमतीत विकले जात आहे.

चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

- दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
- कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
- चेन्नईमध्ये पेट्रोल 102.74 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर

दुसरीकडे, मध्य प्रदेशात पेट्रोल 37 पैशांनी आणि डिझेल 36 पैशांनी तर पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल 44 पैशांनी आणि डिझेल 41 पैशांनी महागलं आहे. दुसरीकडे, राजस्थानमध्ये पेट्रोल 35 पैसे आणि डिझेल 32 पैसे स्वस्त तर हिमाचलमध्ये पेट्रोल 32 पैसे आणि डिझेल 28 पैसे दराने विकले जात आहे.

दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धामुळे युरोप आणि इतर पाश्चिमात्य देशांनी रशियन तेल घेणे बंद केले होते. तरीही तेलाचा खप कायम होता. भारताने याचा फायदा घेतला आणि रिलायन्स इंडस्ट्रीजसह अनेक मोठ्या पेट्रोलियम रिफायनरींनी युरोपमध्ये पेट्रोल आणि डिझेल निर्यात करण्यास सुरुवात केली. याचा परिणाम असा झाला की भारतीय कंपन्यांच्या कमाईत भरघोस वाढ झाली आहे.